Ganpati Visarjan 2023 : गणपती विसर्जन मिरवणुकींना राज्यभरात सुरूवात; पुढच्या वर्षी लवकर या…

| Updated on: Sep 28, 2023 | 9:09 AM

Ganpati Visarjan and Celebration 2023 : मुंबई, पुण्यासह राज्यभर गणपती विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झालीये. त्यामुळे राज्यातील विविध शहरांमध्ये आणि गावांमध्ये आज जल्लोष पाहायला मिळतोय. तर दुसरीकडे लाडक्या बाप्पाला निरोप देताना गणेशभक्तांच्या डोळ्यात पाणी आली आहे. वाचा सविस्तर...

Ganpati Visarjan 2023 : गणपती विसर्जन मिरवणुकींना राज्यभरात सुरूवात; पुढच्या वर्षी लवकर या...
Follow us on

मुंबई | 28 सप्टेंबर 2023 : गणेशोत्सवामुळे मागचे दहा दिवस दिवस घराघरात जल्लोष पाहायला मिळतोय. सार्वजनिक गणपती मंडळांमध्येही भक्तीमय वातावरण होतं. मात्र आज या आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्याची वेळ आली आहे. आज अनंत चतुर्दशी आहे. त्यामुळे आज दहा दिवसांच्या गणपतीला निरोप दिला जाणार आहे. त्यामुळे गणेशभक्त भावूक झाल्याचं पाहायला मिळतंय. मुंबई पुण्यासह राज्यातील इतर शहरांमध्ये गणपती मिरवणुकींना सुरुवात झाली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल करण्यात आले आहेत. भाविक मात्र आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देताना भावूक झाल्याचं पाहायला मिळत आहे.

मुंबईत मिरवणुकाला सुरुवात

मुंबईच्या राजाच्या मिरवणुकीला सुरूवात झाली आहे. मुंबईचा राजा आता मंडपाच्या बाहेर पडत आहे. त्याच बरोबर गिरगाव चौपाटीवरही घरगुती गणपतींचं विसर्जन केलं जात आहे. या पार्शभूमीवर पालिका प्रशासन सज्ज आहे. मुंबईतील दादर चौपाटीवर विसर्जनाची तयारी पूर्ण झाली आहे. 25 जीव रक्षकांची तैनात आहेत. संपूर्ण दादर चौपाटी परिसरामध्ये बांबूची बारिकेटिंग दादर मातोश्री क्लबपासून या विसर्जनाला सुरुवात होणार आहे. आज सकाळी आणि रात्री 11 वाजता समुद्रात भरती , 4.80 मीटर इतक्या लाटा उसळणार आहेत. खोल समुद्रात निसर्जनासाोटी जाऊ नये, जेली फिशच्या दंशाचा धोका संभवतो , त्यामुळे भक्तांनी काळजी घ्यावी, असं आवाहन मनपाकडून करण्यात आला आहे.

थोड्याच वेळात पुण्यात मिरवणुकीला सुरुवात

पुण्यात मंडई परिसरात गणपती विसर्जनाची तयारी पूर्ण झाली आहे. मंडई परिसरातून मानाच्या गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होते. पालकमंत्री चंद्रकांत पाटलांच्या हस्ते पहिल्या मानाच्या गणपतीची आरती करून मिरवणूक सुरू होणार आहे. पुण्यातील मानाचा पहिला कसबा गणपतीची थोड्या वेळात विसर्जन मिरवणूक निघणार आहे. गणपती बाप्पसाठी खास रथही बनवण्यात आला आहे. मोठी रांगोळी काढण्यात आली आहे. मानाचा पहिला कसबा गणपती निघाल्यानंतर इतर मंडळ विसर्जन मिरवणुकीसाठी निघणार आहेत.

पुण्यात पोलीस प्रशासन सज्ज

विसर्जन मिरवणुकीसाठी पुणे पोलीस प्रशासन सज्ज झालं आहे. 9 हजार पेक्षा अधिक पोलीस अधिकारी आणि कर्मचारी शहरभर तैनात करण्यात आले आहेत. त्यामुळे पुणे शहरातील सर्व मुख्य रस्ते वाहतुकीसाठी करण्यात बंद आले आहेत. 1800 पेक्षा जास्त सीसीटीव्ही या विसर्जन मिरवणुकीवर करडी नजर ठेवून असतील. विसर्जन मिरवणुकीमुळे जड वाहनांना पुण्यात येण्यास पूर्णपणे बंदी आहे. 2000 पेक्षा अधिक गणेश मंडळांच्या गणपतीचं आज विसर्जन होणार आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्ये वाहतुकीत बदल

सालाबाद प्रमाणे येणाऱ्या अनंत चतुर्दशी म्हणजेच लाडक्या गणपती बाप्पांचे विसर्जन तसेच ईद-ए-मिलाद सणाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर शहरातील प्रमुख रस्त्यांवरील वाहतुकीत व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे,विसर्जन मिरवणुका संपेपर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांना शहरात बंदी असेल तसेच पोलिसांना दिलेला पर्यायी मार्गांचा वापर करावा असे आवाहन देखील पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे याबाबत सविस्तर माहिती पोलीस आयुक्त मनोज लोहिया आणि वाहतूक शाखा सहाय्यक पोलीस आयुक्त धनंजय पाटील यांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली आहे.