मुंबई : उस्मानाबाद येथील सुषमा अंधारे यांची सभा उधळून टाकण्याचा इशारा मनसेनं दिलाय. राज ठाकरे यांच्यावर सुषमा अंधारे यांनी आरोप केला होता. त्यावर सुषमा अंधारे यांनी माफी मागावी, असं मनसेनं म्हंटलंय. सभा उधळणाऱ्यांचं स्वागत आहे, असं उत्तर सुषमा अंधारे यांनी दिलंय. सुषमा अंधारे म्हणाल्या, आमच्याकडं एक असा माणूस आहे पठ्ठ्या ये दुपारी नि घे सुपारी असा काही कार्यक्रम असतो. राज ठाकरे यांच्या टीकेनंतर मनसेचे कार्यकर्ते आक्रमक झालेत. याआधीच्या सभेत सुषमा अंधारे यांनी राज ठाकरे यांच्यावर जहरी टीका केली होती.
सुषमा अंधारे यांची उस्मानाबाद येथील सभा उधळून लावण्याचा इशारा मनसे कार्यकर्त्यांनी दिला. त्याचं कारण सुषमा अंधारे यांनी केलेली टीका. सुषमा अंधारे म्हणाल्या, दादा मातोश्रीवर नाहीरे मजले चढले दादा. इतकी वर्षे महापालिका ताब्यात असताना मातोश्रीवर मजले चढले नाहीत. पण, कृष्णकुंजच्या बाजूला अजून अपार्टमेंट तयार झाले त्याचं काय.
आमच्याकडं असा एक माणूस आहे पठ्ठ्या. उठ दुपारी, घे सुपारी असा कार्यक्रम असतो. ते अचानक गुहेतून बाहेर पडतात. अचानक सभा घेतात. परत गायब होतात. या टीकेवर मनसेनं उत्तर दिलंय. तिला बोलायला ठेवलंय. भुंकायला नाही. मेंदूला नारू झाला की काय तिच्या. नवीन मुसलमान झाली म्हणून आदाब आदाब करत सुटली ती. ती स्त्री आहे म्हणून मी गप्प आहे, असं मनसेचे पदाधिकारी म्हणाले.
याआधी जळगावात सभा घेताना सुषमा अंधारे यांनी गुलाबराव पाटील यांच्यावर निशाणा साधला होता. कायदा आणि सुव्यवस्थेचं कारण देत सुषमा अंधारे यांच्या सभांना परवानगी नाकारण्यात आली. सिंधुदुर्गात सुषमा अंधारे यांनी राणे पिता-पुत्रांना लक्ष्य केलं.
आता सुषमा अंधारे या उस्मानाबादेत सभा घेत आहेत. माफी मागितल्याशिवाय सभा न होऊ देण्याचा इशारा मनसे कार्यकर्त्यांनी दिलाय. राडा या शब्दाची उत्पत्ती ही शिवसेनेकडूनचं झाली. त्यामुळं त्यानं काही फरक पडत नसल्याचं सुषमा अंधारे म्हणाल्या.