उद्या सायंकाळी वर्सावा-घाटकोपर मेट्रो दोन तासांसाठी बंद

| Updated on: Jan 18, 2023 | 8:44 AM

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या मुंबईच्या दौऱ्यावर येणार आहेत. मुंबई मेट्रो 2 ए आणि मेट्रो 7 या मार्गिकेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. या कारणास्तव घाटकोपर ते वर्सोवा धावणाऱ्या मेट्रोला सायंकाळी या वेळेत बंद ठेवण्यात येणार आहे.

उद्या सायंकाळी वर्सावा-घाटकोपर मेट्रो दोन तासांसाठी बंद
metro
Follow us on

मुंबई :  पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. पंतप्रधानांच्या मुंबई दौऱ्यात विविध प्रकल्पांचे उद्घाटन आणि भूमीपूजन करण्यात येणार आहे. यामध्ये मुंबई मेट्रो 2 ए आणि मेट्रो 7 या मार्गिकेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमामुळे घाटकोपर ते वर्सोवा धावणारी मुंबई मेट्रो वन सायंकाळी दोन तासांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय मुंबई मेट्रो वनच्या प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे प्रवाशांनी उद्या प्रवास करताना पर्यायी व्यवस्था करावी असे आवाहन करण्यात आले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या गुरूवारी मुंबईत येणार असून बीकेसी येथे त्यांच्या हस्ते अनेक प्रकल्पांचे लोकार्पण करण्यात येणार आहे. यामध्ये मुंबई मेट्रो 2 ए आणि मेट्रो 7 या मार्गिकेचे देखील उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. या कारणामुळे गुरूवारी घाटकोपर ते वर्सोवा धावणाऱ्या मुंबई मेट्रो वनचे ऑपरेशन सायंकाळी 5.45 ते 7.30 या दरम्यान थांबवण्यात येणार आहे.

प्रवाशांसाठी महत्वाची सूचना

घाटकोपर ते वर्सोवा धावणारी मेट्रो मुंबईतील पहिली मेट्रो असून 2014 पासून तिची सुरूवात करण्यात आली आहे. उद्या उद्घाटन होणाऱ्या मुंबई मेट्रो 2 ए आणि मेट्रो 7 या नव्या मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याशी या जुन्या मेट्रोला पादचारी मार्गिकेने जोडले गेले आहे. पंतप्रधानांच्या कार्यक्रमादरम्यान सुरक्षेच्या कारणास्तव मेट्रोला बंद ठेवण्याचा निर्णय मेट्रो प्रशासनाने घेतल्याने प्रवाशांनी आपल्या प्रवासाचे नियोजन त्यानूसार करावे असे आवाहन मुंबई मेट्रो वन प्रशासनाने केले आहे.