एकीकडे कोलकाता येथे महिला डॉक्टरचा बलात्कारातून निघृण हत्या झालेली असताना आता ठाणे महानगर पालिकेच्या कळवा येथील रुग्णालयाच्या आवारात एका नराधमाने दिव्यांग मुलीचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या मुलीच्या नातेवाईकांच्या सर्तकेने पुढील अनर्थ टळला असून या रुग्णाचे नातेवाईक आणि संपकरी डॉक्टरांना या नराधमाला बेदम चोपल्याची घटना उघडकीस आली आहेय
ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या आवारातील उद्यानात अल्पवयीन दिव्यांग मुलीचा विनयभंग करण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकारानंतर या नराधमास रुग्णाचे नातलग आणि डॉक्टरांनी बेदम चोप देत पोलिसांच्या हवाली केले आहे. प्रदीप शेळके (४२) असे या नराधमाचे नाव असुन एका रुग्णाच्या नातेवाईकाच्या आणि रुग्णालयातील एमएसएफ सुरक्षा रक्षकाच्या सतर्कतेमुळे पुढील अनर्थ टळला आहे.
आपल्या आईसोबत कळवा रुग्णालयात आलेली अकरा वर्षीय पिडीत मुलगी रुग्णालयाच्या आवारात उभी होती. त्यावेळी नराधम प्रदीप याने त्या मुलीला जवळच्या उद्यानात नेले. तेथे तो मुलीशी अश्लिल चाळे करीत असताना हा प्रकार एका रुग्णाच्या नातेवाईकाने पाहीला. या रुग्णाच्या नातेवाईकाने या घृणास्पद प्रकाराची माहिती संपकरी डॉक्टरांना दिली. डॉक्टरांनी तात्काळ रुग्णालयातील सुरक्षा रक्षकांना बोलावून प्रदीप याला चोप देत ताब्यात घेतले. तसेच या प्रकाराची माहिती कळवा पोलिसांना दिली. त्यानुसार, घटनास्थळी दाखल झालेल्या पोलीसांनी आरोपी प्रदीप याला अटक केली आहे.