मुंबई : जगभरात धुमाकूळ घातलेल्या कोरोना विषाणूचा (Gold Rate Fall) मोठा परिणाम आता राष्ट्रीय आंतराष्ट्रीय बाजारावर होतो आहे. एकीकडे शेअर बाजारात निर्देशांक 3100 अंकांनी कोसळल्याने सर्व व्यवहार ठप्प पडले. तर दुसरीकडे, सोन्याच्या भावातही विक्रमी घसरण (Today’s Gold Rate) झाली आहे. सोन्याच्या भावात तब्बल 2 हजार 600 रुपयांची घसरण झाली आहे (Gold Rate Fall).
सेन्सेक्समधील पडझडीचा परिणाम (Gold Rate Fall) सोने दरावरही होत आहे. आज एकवेळ अशी आली की सोन्याच्या दरात तब्बल 2,600 रुपयांनी घसरले. त्यामुळे सोन्याचा तोळ्याचा भाव 41,600 रुपयांवर पोहोचला. त्यानंतर मार्केटमध्ये चढउतार सुरुच आहे. दिवसअखेर सोन्याचा भाव कितीवर स्थिरावतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
हेही वाचा : Share Market | मुंबई शेअर मार्केटमध्ये ऐतिहासिक पडझड, तासाभरासाठी व्यवहार बंद, सोन्याचे दरही पडले
कोरोनामुळे गेल्या दोन दिवसांपासून सोन्याच्या भावात (Gold Rate Fall) सतत घसरण होत आहे. काल सोन्याचा भाव 44 हजार 200 रुपये प्रति तोळा होता. त्यामध्ये आज विक्रमी घसरण झाली असून आजचा सोन्याचे दर 41 हजार 600 रुपये प्रति तोळापर्यंत पोहोचले.
सोनं दराच्या घसरणवर तज्ज्ञ काय म्हणतात?
“कोरोना विषाणूचा शेअर बाजारावर मोठ्या (Today’s Gold Rate) परिणाम झाला आहे. फ्रान्स, जर्मनी, लंडन, अमेरिकेच्या कोस्टल एरियावर याचा परिणाम झाला आहे. मुंबईतही याचा मोठा फटका बसला आहे. मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने त्याचा पेमेंट आता सोन्यामध्ये होणार आहे. म्हणून सोन्याच्या भावात इतकी मोठी घसरण झाली”, अशी माहिती शेअर बाजार तज्ज्ञ कुमार जैन यांनी दिली.
“काल ते आजपर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या भावात 85 डॉलरची घसरण झाली आहे. त्यामुळे जे सोनं काल 44 हजार 200 रुपयांवर होतं ते आज 41 हजार 600 वर येऊन पोहोचलं आहे. पण पुढे सोन्याचे भाव वाढण्याची शक्यता आहे. कितीही मोठी महामारी आली तरी लोक सोनं घेणारच. सोनं अजून कमी होईल आणि मग ते वधारेल.”, असंही कुमार जैन (Gold Rate Fall) यांनी सांगितलं.
संबंधित बातम्या :
जगभरात आर्थिक मंदीचं सावट, सोन्याचे भाव वाढतेच, तर चांदीच्या किमतीत घट
भारतात कोरोनाचा पहिला बळी, कर्नाटकात 76 वर्षीय रुग्णाचा मृत्यू
सॅनिटायझर नव्हे, कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी साबणच प्रभावी हत्यार