Modi Express : गणेशोत्सवाला कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; यंदाही मोदी एक्स्प्रेस धावणार, मोफत प्रवासाची संधी

| Updated on: Jul 16, 2022 | 11:06 AM

भाजपाच्या (BJP) वतीने मुंबईतून कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमाण्यांसाठी खास मोदी एक्स्प्रेसची व्यवस्था करण्यात आली आहे. या रेल्वेतून प्रवाशांना मोफत प्रवास करताय येणार आहे.

Modi Express : गणेशोत्सवाला कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; यंदाही मोदी एक्स्प्रेस धावणार, मोफत प्रवासाची संधी
कोकण रेल्वे
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

रत्नागिरी : गणेशोत्सव (Ganeshotsav) अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. गणेशोत्सवासाठी मोठ्या संख्येने चाकारमाने कोकणात जात असतात. त्यामुळे या काळात कोकणात (Konkan)जाणाऱ्या बस तसेच रेल्वे गाड्या फूल्ल असतात. रेल्वे गाड्यांच्या आणि बसच्या आरक्षणास दोन महिने आधीच सुरुवात होते. या काळात रेल्वे प्रशासन आणि राज्य परिवहन विभागामार्फत काही स्पेशल गाड्या देखील मुंबईतून कोकणासाठी सोडण्यात येतात. गेल्या वर्षी पहिल्यांदाच कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी भाजपाच्या (BJP) वतीने मोदी  एक्स्प्रेस चालवण्यात आली होती. मोदी एक्स्प्रेसच्या माध्यमातून मुंबईतून कोकणात जाणाऱ्या चाकरणमान्यांच्या मोफत प्रवासाची व्यवस्था करण्यात आली होती. या एक्स्प्रेसचा गेल्या वर्षी अनेक प्रवाशांनी लाभ घेतला. दरम्यान या वर्षी देखील मुंबई भाजपाच्या वतीने मोदी एक्स्प्रेस चालवण्यात येणार आहे.

यंदा कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढणार

गेले दोन वर्ष देशासह राज्यावर कोरोनाचे संकट होते. त्यामुळे प्रवासावर देखील मर्यादा आल्या, अनेकांना इच्छा असूनही कोकणात गणेशोत्सवासाठी जाता आले नाही. मात्र आता कोरोना संकट कमी झाले असून, सर्व निर्बंध उठवण्यात आले आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर यंदाचा गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा होण्याची शक्यता आहे. मुंबईमधून मोठ्या संख्येने चाकरमाने हे गणेशोत्सवासाठी कोकणात जात असतात. त्यांच्यासाठी मुंबई भाजपाच्या वतीने खास मोदी एक्स्प्रेसची व्यवस्था करण्यात आली आहे. ही एक्स्प्रेस 28 ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता दादर रेल्वे स्थानकातून सुटणार आहे. या ट्रेनचा मार्ग दादर ते सावंतवाडी असा असणार आहे.

हे सुद्धा वाचा

जास्तीत जास्त प्रवाशांनी लाभ घेण्याचे आवाहन

मुंबई भाजपाच्या वतीने मुंबईतून कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमाण्यांसाठी खास मोदी एक्स्प्रेसची व्यवस्था करण्यात आली आहे. हे या गाडीचे दुसरे वर्ष आहे. या रेल्वेतून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना मोफत प्रवास करता येणार आहे. ही ट्रेन 28 ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता दादर रेल्वेस्थानकातून सुटणार आहे. दादर ते सांवतवाडी असा या ट्रेनचा मार्ग असणार आहे.  प्रवाशांना या ट्रेनमधून मोफत प्रवास करता येणार आहे. गेल्या वर्षी देखील ही ट्रेन चालवण्यात आली होती. प्रवासासोबतच प्रवाशांच्या एकवेळच्या जेवणाची मोफत व्यवस्था करण्यात आली होती. यंदा देखील दादर ते सावंतवाडी दरम्यान मोदी एक्स्प्रेस धावणार असून, अधिकाधिक संख्येने प्रवाशांनी या सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन मुंबई भाजपाच्या वतीने करण्यात आले आहे.