मुंबई : मुंबईकरांची ट्रॅफीकच्या कटकटीतून मुक्तता करणारी मुंबईतील पहिली अंडरग्राऊंड मेट्रो तीनचा पहीला आरे ते बीकेसी टप्पा असा डिसेंबर 2023 मध्ये सुरू करण्याची घोषणा करण्यात आली होती. आणि त्यानंतर संपूर्ण कुलाबा – बीकेसी – सीप्झ अशी मेट्रो तीन ही भूयारी ट्रेन जून 2024 पर्यंत सुरू होणार आहे. परंतू ज्या वेगाने काम सुरू आहे, हे पहाता या डेडलाईनच्या आधीच भूयारी मेट्रो वरळीपर्यंत सुरू करण्यात येईल अशी माहीती मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या मुख्य व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांनी एफपीजेला दिली आहे.
मुंबईच्या पहिल्या भूयारी मेट्रो तीनचा संपूर्ण टप्पा पुढील वर्षी जून 2024 पर्यंत सुरू करण्याची तयारी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या वतीने सुरू आहे. परंतू त्याआधीच ट्रेनच्या रिव्हर्सलची फॅसिलीटी उपलब्ध झाल्याने वरळीपर्यंत भूयारी मेट्रो सुरू करण्यात येईल असे भिडे यांनी एफपीजेला सांगितले आहे.
भूयारी मेट्रो कुलाबा – बीकेसी – सीप्झचा बीकेसी ते आरे पहीला टप्पा डिसेंबर 2023 मध्ये पूर्ण होणार आहे. मात्र प्रत्यक्षात भूयारी मेट्रो तीन ही जानेवारी 2024 मध्ये प्रवाशांसाठी सुरू होईल. तसेच संपूर्ण टप्पा जून महिन्यात सुरू होईल असे म्हटले जात आहे. उत्तर दिशेला 33.5 कि.मी.चा संपूर्ण मार्गापैकी पॅकेज 7 चे काम जवळपास संपू्र्ण तयार झाले आहे. त्याचप्रमाणे पॅकेज 6,5 आणि 4 देखील लवकरच पूर्ण होतील. दक्षिण टोकाकडील पॅकेज 1 देखील ऑलमोस्ट रेडी होत आला आहे. परंतू पॅकेट 2 मधील काम गिरगाव आणि काळबादेवीतील रहिवाशांचे पूर्नवसन त्याच जागी करण्याच्या योजनेमुळे रखडले आहे.
गिरगाव आणि काळबादेवीत रहीवासी पुनर्वसनाचे काम अजून सुरू आहे. त्यास वेळ लागणार असला तरी काही ठिकाणी ट्रेन रिव्हर्स घेण्याची सुविधा निर्माण होत आहे. जसे बीकेसी, सहार रोड, वरळीतील आचार्य अत्रे चौक , सीएसएमटी आणि कफपरेड येथे रिव्हर्सल फॅसिलिटी तयार करण्यात आली आहे. त्यामुळे सन 2024 ची वाट न पाहता वरळीपर्यंत भूयारी मेट्रो चालविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
गिरगाव आणि काळबादेवी येथील स्थानके जोपर्यंत तयार होत नाहीत. तोपर्यंत मेट्रो कफपरेडपर्यंत चालविणे अशक्य आहे. या संपूर्ण कॉरीडॉरचे ऑपरेशन आणि मेन्टेनन्सचे काम थर्ड पार्टीला दिले आहे. नऊ कंपन्यांनी त्यासाठी निविदा भरल्या होत्या. त्यातील दोन कंपन्यांची निवड करण्यात आली आहे. दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन आणि Keolis SA. यांची निवड झाली आहे. भूयारी मेट्रो नेव्हीनगरपर्यंत नेण्यासाठी डीपीआर काढण्यात येणार आहे. त्यासाठी दोन महिने लागणार आहेत. त्यानंतर बांधकामासाठी टेंडर मागविण्यात येईल.