पुणे : मुंबई पुणे रेल्वे मार्गावर लोणावळा घाटात मालगाडीचे डब्बे रुळावरुन घसरल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. मुंबईहून पुण्याकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. तसेच मध्य रेल्वेकडून अनेक गाड्याही रद्द करण्यात आल्या आहेत. यामुळे मुंबईहून पुण्याला जाणाऱ्या चाकरमान्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावं लागतं आहे. दरम्यान पुण्याहून मुंबईकडे येणारी वाहतूक मात्र सुरळीत सुरु आहे.
मुंबई पुण्यातील कर्जतजवळील घाट परिसरातील जामरुंग व ठाकूरवाडी स्थानकादरम्यान सकाळी 4.30 च्या सुमारास मालगाडीचे डब्बे घसरले. यामुळे डाऊन आणि मिडल लाईनवरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. या अपघातामुळे मुंबई-पुणे रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. इंटरसिटी, डेक्कन एक्स्प्रेस या महत्त्वाच्या गाड्याही रद्द करण्यात आल्या आहेत. तर, मुंबईहून पुणे मार्गे जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्या इगतपुरीमार्गे वळवण्यात आल्या आहेत.
A goods train derailed in ghat section on Karjat-Lonavala section. Mumbai-Pune train services are affected. Further details will be updated. pic.twitter.com/A7A5SUzfp7
— Central Railway (@Central_Railway) July 1, 2019
यामुळे मुंबई-पुणे दरम्यान अधिक बस चालवण्याची विनंती मध्य रेल्वेने राज्य सरकारला केली आहे. रेल्वे वाहतूक पूर्वपदावर आणण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली आहे. याबाबतचे सुधारीत वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली आहे.
पुण्याकडे जाणाऱ्या ‘या’ गाड्या रद्द
‘या’ गाड्यांच्या मार्गात बदल