मुंबई : गुगल कंपनीने ( Google) केंद्र सरकारच्या अधिकृत आयडेंटीफिकेशन स्टोरेज सिस्टीम म्हणजेच डीजीलॉकर ( DigiLocker ) सोबत एक भागीदारी करार केला आहे. यामुळे एड्रॉईड ( Android ) फोनचा वापर करणाऱ्यांना आता आपल्या मोबाईल फोनमध्ये आपली महत्वाची कागदपत्रे सेव करता येतील असे म्हटले जात आहे.
आपली महत्वाची कागदपत्रे सतत जवळ बाळगणे शक्य नसते. त्यामुळे त्यांना आहे त्या स्वरूपात बाळगण्याऐवजी त्यांच्या झेरॉक्स सोबत ठेवाव्या लागतात. त्याऐवजी ही कागदपत्रे जर मूळ रूपात अर्थात ओरीजनल स्वरूपात आता आपल्या मोबाईलवरच सेव्ह करता आली तर किती मजा येईल. तर आता ते शक्य झाले आहे. आता आपल्या मोबाईलवरच सर्व कागदपत्रे मूळ स्वरूपात सेव्ह करता येणार आहेत. त्यामुळे कागदपत्रे गहाळ होण्याचा किंवा त्यांना सतत जवळ बाळगण्याच्या त्रासातून आता सुटका होणार आहे.
डीजीलॉकर हे मोबाईल एप प्ले स्टोअरवर उपलब्ध असून त्यात सर्व डॉक्युमेंट सुरक्षित ठेवण्याची सोय आहे. गुगल कंपनीने सरकारच्या या डीजीलॉकर सोबत भागीदारी केली आहे. गुगल फॉर इंडीया इव्हेंटमध्ये या भागीदारीची घोषणा करण्यात आली आहे. या सोहळ्याला गुगलचे सीईओ सुंदर पिचई देखील उपस्थित होते. या भागीदारीमुळे डीजीलॉकर एपचे इंटीग्रेशन फाइल्स एपमध्ये होईल.
गुगल कंपनीने एक मशीन लर्निंग बेस्ड मॉडेलचीही घोषणा केली आहे. जो अधिकृत दस्ताऐवजांचे तसेच सरकारी आयकार्डसह सर्व महत्वाच्या फायलींना ओळखणे आणि त्यांचे व्यवस्थापन करणे आदीसाठी मदत करणार आहे.