मुंबई : सचिन वाझे प्रकरणात मुंबई पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. त्याच्या जागी राज्याचे पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांच्याकडे मुंबई पोलीस आयुक्तपदाचा कार्यभार सोपवण्यात आला आहे. त्यामुळे रिक्त झालेल्या राज्याच्या पोलीस महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार रजनीश शेठ यांच्याकडे देण्यात आला आहे. त्यामुळे कोण आहेत रजनीश शेठ? आणि त्यांचा कामगिरी कशी राहिली आहे? याचा घेतलेला हा आढावा.(additional charge of the post of Director General of Police to Rajneesh Sheth)
>> रजनीश शेठ हे 1988 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी..
>> 29 डिसेंम्बर 1963 रोजी रजनीश शेठ यांचा जन्म
>> 25 ऑगस्ट 1988 ला पोलीस दलात भरती.
>> रजनीश शेठ यांचं शिक्षण बी ए ऑनर्स (एल एल बी) झालं आहे.
>> आझाद मैदान दंगलीच्या वेळी रजनीश शेठ हे मुंबईचे कायदा आणि सुव्यस्था विभागाचे सहपोलिस आयुक्त होते.
>> रजनीश शेठ हे फोर्स वन महाराष्ट्राचे प्रमुख राहिलेले आहेत.
>> गृह विभागाचे प्रधान सचिव म्हणूनही शेठ यांनी जबाबदारी संभाळलेली आहे.
>> राज्याच्या कायदा आणि सुव्यस्था विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक म्हणूनही त्यांनी काम केलं आहे.
>> नुकतीच त्यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली होती.
दरम्यान, शांत स्वभावाचे अधिकार म्हणून रजनीश शेठ यांची ओळख आहे. रजनीश शेठ आतापर्यंत कुठल्याच वादात सापडलेले नाहीत.
हेमंत नगराळे होणार नवे मुंबई पोलीस आयुक्त
रजनीश शेठ यांच्याकडे पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य या पदाचा अतिरिक्त कार्यभार
संजय पांडे यांच्याकडे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाची जवाबदारी
परमवीर सिंह यांच्याकडे गृहरक्षक दलाची जवाबदारी
सरकारचा मोठा निर्णय
श्री हेमंत नगराळे होणार नवे मुंबई पोलीस आयुक्त
श्री रजनीश शेठ यांच्या कडे पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य या पदाचा अतिरिक्त कार्यभार
श्री संजय पांडे यांच्या कडे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाची जवाबदारी
श्री परमवीर सिंह यांच्या कडे गृह रक्षक दलाची जवाबदारी— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) March 17, 2021
हेमंत नगराळे मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; कोण आहेत नगराळे?
Param Bir Singh : हे ठाकरे सरकारचे पाप, मुंबई पोलिसांची इतकी बदनामी कधीच झाली नाही, भाजपचा हल्लाबोल
additional charge of the post of Director General of Police to Rajneesh Sheth