Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट : सरकारच्या अध्यादेशानंतर पोलीस भरतीमधील वयोमर्यादा वाढवण्यासाठीचं सुषमा अंधारेंचं उपोषण मागे

| Updated on: Jul 06, 2024 | 12:25 AM

ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंनी आझाद मैदानावरील उपोषण मागे घेतलंय. 2023 मधील वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांची वयोमर्यादा वाढवण्याच्या मागणीसाठी त्यांचं उपोषण सुरु होतं. सरकारकडून काढण्यात आलेल्या अध्यादेशानंतर त्यांनी आपलं उपोषण मागे घेतलं.या संदर्भातील पाहा स्पेशल रिपोर्ट.

Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट : सरकारच्या अध्यादेशानंतर पोलीस भरतीमधील वयोमर्यादा वाढवण्यासाठीचं सुषमा अंधारेंचं उपोषण मागे
Follow us on

सुषमा अंधारेंनी आझाद मैदानावरील आपलं उपोषण मागे घेतलंय. पोलीस भरतीच्या उमेदवारांची वयोमर्यादा वाढवण्याच्या मागणीसाठी अंधारेंचं 2 दिवसांपासून उपोषण सुरु होतं. मात्र, 2023मधील वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना 2024च्या भरतीत सामावून घेणार असल्याचा अध्यादेश सरकारकडून काढण्यात आलाय. दरम्यान या अध्यादेशानंतर सुषमा अंधारेंनी आझाद मैदानावरील आपलं उपोषण मागे घेतलंय.

सुषमा अंधारेंच्या उपोषणावरुन संजय शिरसाट यांनी त्यांना टोला लगावला होता. भरतीसाठी वय लागतं अंधारे वयात बसत नाही असा, खोचक टोला शिरसाटांनी लगावला होता. दरम्यान त्यांच्या या टीकेनंतर अंधारेंनीही त्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं होतं. अंधारेंनी शिरसाटांचा मूर्ख उल्लेख केल्यानंतर, शिरसाटांनी पुन्हा एकदा अंधारेंवर निशाणा साधला होता. मात्र, त्यांच्या टीकेनंतर सुप्रिया सुळेंनी शिरसाटांना धारेवर धरलं. शिरसाट नेहमीच महिलांविरोधात वक्तव्य करत असल्याचं म्हणत जोरदार हल्लाबोल केला.

पाहा व्हिडीओ:-

संजय शिरसाटांनी अंधारेंच्या उपोषणाला केलेल्या विरोधानंतर पोलीस भरतीचे विद्यार्थी देखील आक्रमक झाले होते. शिरसाटांनी आम्हाला विरोध केल्यास आम्ही देखील त्यांना विरोध करु असा इशारा यावेळी विद्यार्थ्यांकडून देण्यात आलाय. दरम्यान, सरकारनं काढलेल्या अध्यादेशानंतर सुषमा अंधारेंनी आपलं उपोषण मागे घेतलंय. त्यामुळे 2023मध्ये वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना 2024च्या पोलीस भरतीत समावून घेण्यात येणारय.