मुंबई : राज्यात कोरोना विषाणूचे रुग्ण पुन्हा वाढू लागले आहेत. राज्यात दरदिवशी 8 हजारांहून अधिक रुग्ण आढळत आहेत. कोरोनाच्या महामारीचा लोकांनी मोठा धसका घेतला होता. मात्र मी कधीही कोरोनाला घाबरलो नाही. ज्यांच्या मनात करुणा आहे त्यांना कोरोना कधीही होणार नाही, असे वक्तव्य राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले. (Governor bhagat singh koshyari on corona)
राजभवनात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर राष्ट्रीय पुरस्कार सोहळा पार पडला. या सोहळ्याला राज्यपाल कोश्यारी आणि रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी हजेरी लावली. यावेळी कोश्यारी आणि आठवलेंच्या खुमासदार भाषणाची जुगलबंदी रंगली.
“कोरोनाच्या महामारीचा लोकांनी मोठा धसका घेतला होता. मात्र मी कधीही कोरोनाला घाबरलो नाही. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी गो कोरोनाचा नारा दिला होता. या नाऱ्याचा उल्लेख राज्यपालांनी भाषणादरम्यान केला. मी कोरोनाला कधीही घाबरलो नाही. राजभवनमध्ये सतत लोक मला भेटत राहिले. टाळेबंदीच्या काळात ही मी लोकांना भेटणे सोडले नाही. आता तर राजभवन हे लोकभवन झाले आहे. मला लोक विचारतात की तुम्ही किती लोकांना राजभवन मध्ये भेटता, तुम्हाला कोरोना होण्याची भीती वाटत नाही का? त्यांना मी उत्तर देतो की ज्यांच्या मनात करुणा आहे त्यांना कोरोना कधीही होणार नाही,” असे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी म्हणाले.
“कोरोनाला घाबरु नका तर काळजी घ्या, खबरदारी घ्या, हात स्वच्छ धुवा, मास्क वापरा आणि फिजिकल डिस्टन्सचा नियम पाळा,” असे आवाहन भगतसिंह कोश्यारी यांनी केले.
— Governor of Maharashtra (@maha_governor) February 28, 2021
“पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य ऐतिहासिक क्रांतिकारी आहे. त्या अत्यंत शूर पराक्रमी होत्या. त्याच प्रमाणे तत्वज्ञानी न्यायदान करणाऱ्या लोककल्याण करणाऱ्या प्रजाहितदक्ष राज्यकर्त्या राणी होत्या. मनापासून त्यांनी जनतेची सेवा केल्याने लोककल्याणकारी राज्य केल्याने त्यांना लोकांनीच देवी उपाधी दिली. पुण्यश्लोक अहिल्यादेविंचा मराठी जनतेला अभिमान आहे. धनगर समाजाचे त्या दैवत आहेत. त्यांचा आदर्श घेऊन आपण काम केले पाहिजे,” असेही राज्यपाल म्हणाले.
“जे लोक लाईफमध्ये फक्त वाईफसाठी काम करतात त्यांना पुरस्कार मिळत नाही तर जे लोक वाईफला सांभाळून लाईफ मध्ये गरिबांची गरजूंची सेवा करतात. समाजसेवेत स्वतःला वाहून घेतात. त्यांचा समाज पुरस्कार देऊन गौरव करते. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर राष्ट्रीय पुरस्कार ज्यांना लाभला त्यांचे यावेळी रामदास आठवले यांनी अभिनंदन केले.”
यावेळी खासदार छत्रपती उदयन राजे यांनी पुण्यश्लोक अहिक्यादेवी होळकर यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव केला. यावेळी उदयनराजे महाराज यांनी रामदास आठवले यांचा आपले मोठे भाऊ असा उल्लेख करत आदरभाव व्यक्त केला.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर राष्ट्रीय पुरस्कार दिवंगत भय्युजी महाराज यांना देण्यात आला. तो पुरस्कार त्यांची कन्या कुहू यांनी स्वीकारला. (Governor bhagat singh koshyari on corona)
संबंधित बातम्या :
कायदे मंत्री मराठा आरक्षणाच्या बैठकीला गैरहजर का राहिले?, या मागे फडणवीस तर नाहीत?: काँग्रेस