मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी(Bhagatsingh Koshyari) यांच्या हस्ते प्रसिद्ध क्रिकेटपटू व क्रीडा प्रशिक्षक दिलीप वेंगसरकर यांना क्रिकेटमधील योगदानाबद्दल जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. सीएसआर जर्नल या डिजिटल व प्रिंट प्रकाशनातर्फे हा पुरस्कार देण्यात आला. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई (Mumbai) येथे राज्यपालांच्या हस्ते सामाजिक दायित्वाच्या माध्यमातून उत्कृष्ट कार्य करणाऱ्या विविध कॉर्पोरेट्स व संस्थांना चौथे सीएसआर जर्नल एक्सलन्स पुरस्कार 2021 प्रदान करण्यात आले, त्यावेळी वेंगसरकर यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी या कार्यक्रमात देखील इंग्रजी ऐवजी मराठी (Marathi) किंवा हिंदी भाषा वापरण्याचा आग्रह केलाय. राज्यपालांनी यापूर्वी देखील एका कार्यक्रमात इंग्रजीतून सूत्रसंचालन करणाऱ्या निवेदिकेला थांबवत हिंदी किंवा मराठी भाषेचा वापर करायला सांगितला होता.
राज्यपाल भगतसिंह कोशारी यांनी आजच्या कार्यक्रमात तुम्ही इंग्रजी भाषा वापरत आहात त्यामध्ये इंग्रजी एैवजी हिंदी किंवा मराठी भाषांचा वापर करुन प्रसार करायला हवा, असं म्हटलं. राज्यपाल भगतसिंह कोशारी यांचा प्रादेशिक भाषांचा प्रसार करण ही आपली सर्वांची सामाजिक जबाबदारी असून ती पार पाडली पाहिजे असा आग्रह धरला. इंग्रजी भाषेएैवजी मराठी हिंदी भाषा वापरण्याचं आवाहन केलं आहे.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते सामाजिक दायित्वाच्या माध्यमातून उत्कृष्ट कार्य करणाऱ्या विविध कॉर्पोरेट्स व संस्थांना चौथे सीएसआर जर्नल एक्सलन्स पुरस्कार २०२१ प्रदान करण्यात आले. यावेळी क्रिकेटपटू व प्रशिक्षक दिलीप वेंगसरकर यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. pic.twitter.com/dMRMGrMq4l
— Governor of Maharashtra (@maha_governor) March 20, 2022
राज्यपाल भगतसिंह कोशारी यांनी कार्यक्रमात वारंवार इंग्रजीभाषेबद्दल आक्षेप घेतला. प्रकाश आमटे गेल्या कित्तेक वर्षांपासून आदिवासी भागात काम करतात ते त्याचींच भाषा बोलतात. इंग्रजी आवश्यक पण तरीही प्रादेशिक भाषा महत्वाच्याच आहेत. प्रादेशिक भाषा टिकवणं ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असल्याचं ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आल्यानंतर सी एस आर फंड जास्तीत जास्त वापरायला सुरूवात झाली. हे बिल मोदी येण्याआधीच होतं पण त्याचा वापर आत्ता वाढला आहे. घर घर शौचालय ही संकल्पना पंतप्रधानांनी मांडल्यानंतर सगळ कॅार्पोरेट जग यासाठी उभा राहिलं, असं राज्यपाल भगतसिंह कोशारी म्हणाले.
गडकरींना लतादिदी आणि अटलजी यांची आठवण आली, म्हणाले मी दोनदाच हार खेरेदी केला…
नितीन गडकरी हे दुर्मिळ प्रजातीचे नेते, Sudhir Mungantiwar असं का म्हणाले?