बुलढाणा : आम्ही पण म्हणतो की शिवसेना ही बाळासाहेबांचीच आहे. संजय राऊत यांच्या शिवसेना एकत्रच आहे. या वक्तव्यावर गुलाबराव पाटील यांनी दुजोरा दिला. संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेमध्ये गट तट नसून, शिवसेना एकत्रच असल्याचं म्हटलं होतं. त्यावर मंत्री गुलाबराव पाटील यांनी सुद्धा दुजोरा दिला. गुलाबराव पाटील म्हणाले, शिवसेना ही एकत्रच आहे. बाळासांहेबांची शिवसेना आहे. बाळासाहेबांच्या शिवसेनेचे विचार एकत्रच आहे. उद्धव ठाकरे जे म्हणतात तेच एकनाथ शिंदे म्हणतात. बाळासाहेबांची शिवसेना म्हणून आम्ही राज्यात काम करतोय. शिवसेनाप्रमुखांना आवडेल, असंच ही शिवसेना करणार आहे. महाराष्ट्रभर शिवसेना प्रमुखांची शिवसेना म्हणून काम करतोय, असंही गुलाबराव पाटील यांनी सांगितलं.
संजय राऊत हे देवेंद्र फडणवीस यांना भेटणार आहेत. यावर गुलाबराव पाटील म्हणाले, संजय राऊत यांनी कोणाला भेटावे, हा त्यांचा विषय आहे. संजय राऊत यांनी नरमाईची भूमिका घेतली. म्हटले होते की राजकारणातील कटूपणा संपवायचाय. यावर गुलाबराव पाटील म्हणाले, आपण त्यांच्या स्वभावाचा विचार करू शकत नाही. शेवटी ज्याचा त्याचा विषय आहे.
संजय राऊत म्हणाले होते की, केंद्राच्या इशाऱ्यानंतर मला अटक झाली. यावर गुलाबराव पाटील म्हणाले, अटक झाली सुटका झाली आणि ते बाहेर आलेत. त्यांच्या म्हणण्याला काय अर्थ आहे. असं काही वाटत नाही.
विमानतळ सुरू करण्यासाठी जागा लागते. काही गोष्टींची तपासणी करावी लागते. प्राथमिक सेंटरवर मागणी करायची असते. मनसेनं चांगली मागणी केली. ती मागणी आम्हालाही मान्य आहे. आम्ही त्यांना मदत करू, असंही गुलाबराव पाटील म्हणाले.