एसटी कर्मचाऱ्यांचा संप एकदाचा मिटला. सरकारने त्यांच्या मागण्यावर यशस्वी तोडगा काढला. त्यामुळे हा संप जास्त काळ चालला नाही. पण एसटी कर्मचाऱ्यांचा संप चिघळण्यासाठी महाविकास आघाडीचे बडे नेते पंचतारांकित हॉटेलमध्ये प्रयत्न करत होते असा गंभीर आरोप गुणरत्न सदावर्ते यांनी केला आहे. त्यांनी ज्या काही संघटनांनी बंद केला होता त्याला कोणाचाच पाठिंबा नव्हता. आमचे 65000 कर्मचारी स्वतःहून उतरून काम करत होते, असा दावा केला.
सदावर्ते यांचा आरोप कुणावर?
मुख्यमंत्र्यांसोबत तोडग्याची बैठक होण्याच्या अगोदर संप पुढे जावा यासाठी पंचतारांकित हॉटेल मधून शरद पवार प्रयत्न करत होते. तसेच बिळातून बाहेर येऊन अनिल परब देखील संप कसा पुढे जाईल याविषयी बघत होते, असा आरोप गुणरत्न सदावर्ते यांनी केला आहे.
पण यांच्या हाताला मी काही लागू दिलं नाही. जे काही बैठकीला आले होते त्यांना हायकोर्टच्या आदेशानुसार बसण्याची परवानगी देखील नव्हती परंतु गयावया करून त्यांना बैठकीला बसू दिलं. बैठकीला बसण्याचा अधिकार देखील त्यांचा काढून घेतला आहे, असा चिमटा त्यांनी काँग्रेस प्रणीत संघटनांना काढला. त्यामुळे सदावर्ते यांचा रोख कुणावर होता हे स्पष्ट झाले आहे.
एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाई नको
त्यांनी श्रेय घेण्याची गरजच नाही कारण हे सर्व तेजाजी आमचा आहे कारण त्यांनी बैठकीमध्ये केवळ 5000 रुपयांची मागणी केली होती आणि आम्ही साडेसहा हजार रुपये मिळवून दिले. तसेच जे संपामध्ये कर्मचारी सहभागी झाले आहेत. त्यांच्यावरती कारवाई करू नये अशी देखील मागणी आम्ही केली होती पण त्यांनी तोंडातून शब्द देखील काढला नाही म्हणजे ते किती कर्मचार्यांच्या विरोधात आहे ते दिसून येते, असा आरोप त्यांनी केला.
सातव्या वेतन आयोगासाठी प्रयत्न
काल मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये काल बैठक पार पडली. ज्या काही संघटनांनी बंद केला होता त्याला कोणाचाच पाठिंबा नव्हता. आमचे 65000 कर्मचारी स्वतःहून उतरून काम करत होते. आम्ही आमचं बैठकीत म्हणणं मांडलं तसेच सातवा वेतन आयोग देखील लागू करावा याविषयी देखील आमच्या इथून पुढे प्रयत्न सुरू राहतील. काँग्रेसच्या कातडीचे काही वयोवृद्ध आणि रिटायर्ड झालेली माणसं होती त्यांना जयश्री पाटलांनी चांगला प्रसाद दिला आहे, असे ते म्हणाले.