मुंबई | आगामी निवडणूकांआधी जागावाटपावरून महायुती आणि मविआकांचं बैठकांचं सत्र सुरू आहे. काही जागांवरून सत्ताधारी आणि विरोधी पक्षा आपापसात चर्चा करत आहे. लोकसभा निवडणूका झाल्यावर विधानसभा निवडणूकाही आहेत. त्यामुळे राजकीय समीकरण कशी आणि किती बदलतात आणि कोणाचं तिकीट कापलं जाणार आणि कोणाचं तिकीट फायनल होणार याकडे सर्वांच लक्ष लागलं लागलं आहे. अशातच प्रसिद्ध वकील गुणरत्न सदावर्ते यांनीसुद्धा निवडणूकीच्या रिंगणात उतरण्याचे संकेत दिले आहेत.
गुणरत्न सदावर्ते यांनी महाराष्ट्रातील दोन नेत्यांची नावे घेतली आहे. ज्यांच्यविरूद्ध ते निवडणूक लढवण्यासाठी तयार असल्याचं म्हटलं आहे. हे नेते दुसरे तिसरे कोणी नसून माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, त्याचेच सुपुत्र आदित्य ठाकरे आहेत. दोघांविरूद्ध निवडणूक लढवली तर पाणीपत करून सोडणार असल्याचं सदावर्ते यांनी म्हटलं आहे.
चुकीचा विचारांच्या सोबत जाणारे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे अशा लोकांविरुद्ध निवडणूक लढवायची वेळ आली हिंदुत्ववादी पक्षाकडून नक्की डंके की चोट पे लढवेल. त्यांचं पाणीपत करून सोडेल, असं गुणरत्न सदावर्ते यांनी सांगितलं.
नथुराम गोडसे साहेबांच विचारपीठ निर्माण झालं पाहिजे, पावन अस्थी कलशाच्या दर्शनासाठी आलो होतो. दर्शन घेतले त्यांच्या कुटुंबियांशी चर्चा केल्यानंतर, शक्ती प्रदान झालेली आहे.अखंड भारताची चळवळ पुन्हा एकदा उभी राहिली पाहिजे. राजकारणाच्या नावावर आरक्षणाचे दुकानदारी चाललेली आहे. ती थांबली पाहिजे. नथुराम गोडसे यांच्या विचारांना कम्युनिस्ट थांबवू शकत नसल्याचं सदावर्ते म्हणाले.
दरम्यान, सदावर्ते यांनी उद्धव ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना चॅलेंज दिलं आहे. यावर ठाकरे काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.