मुंबई : शरद पवार (Sharad Pawar) यांच्या निवासस्थावर हल्ला करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांचे (St Worker Protest) वकील गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) चांगलेच अडचणीत आले आहेत. या आंदोनानंतर सादवर्तेंच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत चाल्या आहेत. या प्रकरणात रोज नव्या बाबी समोर येत आहेत. त्यामुळे सदावर्तेंचा कोठडी मुक्काम वाढतच चालला आहे. आता सदावर्तेंच्या कोठडी मुक्कामता दोन दिवसांची वाढ झाली आहे. यावेळी कोर्टात दोन्ही बाजुने घामासान युक्तीवाद करण्यात आला आहे. या युक्तीवादात काही महत्वाच्या घडामोडी समोर आल्या आहेत. एसटी कर्मचाऱ्यांची बाजू कोर्टात सदावर्ते आक्रमकपणे मांडत होते. राज्य सरकारवर रोज जोरदार हल्लाही चढवत होते. वेळोवेळी शरद पवरांवर टीका करत होते. मात्र सदावर्तेंनी कोट्यवधी रुपये एसटी कर्मचाऱ्यांकडून गोळा केल्याचा दावा कोर्टात करण्यात आलाय.
या प्रकरणात सुनावणी झाल्यानंतर सरकारी वकील प्रदीप घरत यांनी मीडियाशी संवाद साधला. या केसध्ये न्यायालयात बरीच प्रगती दिसली. सदावर्तेंच्या सीडीआर रिपोर्टमध्ये बरीच माहिती मिळाली आहे. या केसमध्ये कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदवले आहेत. यात गुणरत्न सादवर्ते यांनी प्रत्येक कर्मचाऱ्यांकडून 550 रुपये घेतल्याचे उघड झालं आहे असा दावा सरकारी वकीलांनी केला आहे. तसेच साक्षीदारांनीच तशी कबुली दिली आहे. त्याप्रमाणे त्याने 1 कोटी 80 लाख रुपये त्याने जमा केले. हा पैसा कुठे गेला. त्याचे वाटेकरी कोण आहेत. ते कुणाच्या तरी वाट्याला गेले त्याबाबतही पोलिसांना तपास करायचं आहे, असा यक्तीवाद कोर्टात झाल्याचे सरकारी वकील प्रदीप घरत यांनी सांगितले.
हा दावा खोडताना सदावर्तेंचे वकील गिरीश कुलर्णी यांनी युक्तीवाद केला की, पैसे गोळा केल्याची तक्रार कर्मचाऱ्यांनी केली नाही तर कोर्टात त्याचा उल्लेख का करत आहात, असा सवाल सदावर्तेंचे वकील गिरीश कुलकर्णी यांनी केला. तसेच हा हल्ला होणार हे पोलिसांना माहिती असून पोलीस का नव्हते? आंदोलकांनाच तिथे धक्काबुक्की झाली. स्कॉटलँड दर्जाचे पोलीस गाफील का राहिले? असे अनेक सवाल सदावर्तेचे वकील कुलकर्णी यांनी केले. त्यामुळे या प्रकरणात जोरदार युक्तीवाद होताना दिसून आला. मात्र आता या पैशांचा शोध घेताना पोलिसांच्या हाती काय लागतंय, हेही पाहणं तेवढंच महत्वाचं आहे. प्रकरणाचा तपास पुढे जाईल तशा अनेक नव्या बाबी समोर येण्याची शक्यता आहे.
Amruta fadnavis : महाविकास आघाडी सर्वात भ्रष्ट सरकार, अमृता फडणवीसांची राज्य सरकारवर टीका
Guniratna Sadavarte: गुणरत्न सदावर्तेंना दिलासा नाहीच, पोलीस कोठडीतील मुक्काम दोन दिवसाने वाढला
Kirit Somaiya : किरीट सोमय्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला, INS Vikrant प्रकरणात अडचणी वाढल्या