मुंबई : गुणरत्न सदावर्तेंवर (Gunratna Sadavarte) राज्यात अनेक ठिकाणी केसेस दाखल होत असतानाच आता अनेक नव्या गोष्टी समोर येत आहे. मुंबई पोलिसांनी पवारांच्या (Sharad Pawar) घराबाहेरील आंदोलनाच्या तपासाला आणि सदावर्तेंच्या चौकशीला (St Worker Protest) वेग आणला आहे. सदावर्तेंच्या राहत्या इमरातीपासून ते राहत्या घरापर्यंत सध्या पोलीसांनी झाडाझडती सुरू केली आहे. अशात सदावर्तेंच्या घरी काही डायरी सापडल्याची माहिती समोर आली आहे. आणखीही काही महत्वाचे पुरावे गोळा करण्यात येत आहेत, अशात पोलिसांकडून सदावर्तेंच्या मोबाईलचीही तपासणी कसून सुरू आहे. त्यातूनही काही महत्वाच्या बाबी समोर येण्याची शक्यता आहे. हे आंदोलन होण्याआधी काही बैठका या सदावर्तेंच्या घरी आणि इमारतीच्या छतावर झाल्याचाही पोलिसांना संशय आहे. त्यामुळे इमारतीच्या सीसीटीव्ही फुटेजमधून काही मिळेल का? याचाही शोध सुरू आहे.
सदावर्तेंच्या घराचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांकडून तपासण्यात आलंय. रात्रीच्या वेळी एक कर्मचारी टेरेसवर जाताना दिसत आहे. ज्या बैठका झाल्या होत्या त्याचे सीसीटीव्ही समोर आलेत, असे सांगण्यात ययेत आहे. तसेच आझाद मैदानात विजयी जल्लोष केल्यावर कर्मचारी आणि सदावर्ते घरी आल्याचं सीसीटीव्हीत दिसत आहेत, त्यामुळे सदावर्तेंच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. हे फक्त एका दिवसाच नाही तर अनेकवेळा कर्मचारी या ठिकाणी आल्याचे दिसत असल्याची माहिती देण्यात आली आहे. आता हे फुटेज सदावर्तेंचा पाय आणखी किती खोलात नेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
एवढेट नाही तर सदावर्ते यांच्या घराची जागा ही बिल्डरने आराखड्यात हेल्थ सेंटर अशी दाखवली आहे. पण याच जागी राहती रूम तयार करण्यात आली, असल्याचीही माहिती समोर आली आहे. त्यामुळे सदावर्ते आणि हे बिल्डर या दोघांच्याही अडचणी वाढण्याची शक्यता आहे.तर दुसरीकडे सदावर्तेवर राज्यात गुन्हे दाखल व्हायची मालिका जी मुंबईत सुरू झाली ती अजूनही थाबण्याचे नाव घेत आहे. गुणरत्न सदावर्ते यांच्याविरोधात आता थेट एसटी कर्मचाऱ्याने तक्रार दाखल केल्याचा प्रकार अकोल्यात समोर आला आहे. सदावर्तेविरोधात पहिला गुन्हा मुंबईत दाखल झाला. त्यानंतर हे प्रकरण अकोल्यापर्यंत पोहोचले आहे. मुंबई, पुणे, कोल्हापूर, सातारा, सोलापूर, बीड, अकोला, अशा अनेक ठिकाणी सदावर्तेविरोधात वेगवेगळ्या प्रकरणात गुन्हे दाखल झाले आहे.
Gunratna Sadavarte : गुणरत्न सदावर्तेंची वकिली धोक्यात? कायदेज्ज्ञ म्हणतात बार काऊन्सिल सनद…