मम्मी मला माफ कर… डोळ्यात पाणी आणणारी डॉ. पायलची सुसाईड नोट

| Updated on: Jul 24, 2019 | 4:48 PM

या प्रकरणात पोलिसांनी आरोपपत्र (charge sheet) दाखल केलंय. या आरोपपत्रात डॉ. पायलची सुसाईड नोट हा एक अति महत्त्वाचा पुरावा आहे. या सुसाईड नोटमधील काही महत्त्वाचे मुद्दे टीव्ही 9 मराठीच्या हाती लागले आहेत. पायलने जे काही म्हटलंय ते अत्यंत धक्कादायक आहे.

मम्मी मला माफ कर... डोळ्यात पाणी आणणारी डॉ. पायलची सुसाईड नोट
Follow us on

मुंबई : डॉ. पायल तडवी (Payal Tadvi suicide case) हिने काही दिवसांपूर्वी आत्महत्या केली. या प्रकरणात तिच्या आत्महत्येस जबाबदार असणाऱ्या तिच्या वरिष्ठ तीन महिला डॉक्टरांना अटक करण्यात आली. आता या प्रकरणात पोलिसांनी आरोपपत्र (charge sheet) दाखल केलंय. या आरोपपत्रात (charge sheet) डॉ. पायलची सुसाईड नोट हा एक अति महत्त्वाचा पुरावा आहे. या सुसाईड नोटमधील काही महत्त्वाचे मुद्दे टीव्ही 9 मराठीच्या हाती लागले आहेत. पायलने जे काही म्हटलंय ते अत्यंत धक्कादायक आहे.

पायलची तिच्या आईशी जवळीक होती. आईला उद्देशून अनेक गोष्टी ती सुसाइड नोटमध्ये सांगते. पायलने तीन पानांची सुसाईड नोट हॉस्पिटलच्या केस पेपरसाठी वापरल्या जाणाऱ्या पेपरवर इंग्रजीतून लिहिली आहे.

या सुसाईड नोटमध्ये पायल म्हणते, “मम्मी मला माफ कर.. अगं मी त्यांना समजावण्याचा खूप प्रयत्न केला. मॅडमला सांगितलं, पण काहीच होत नाही. मला माफ करा.. मी तुम्हाला सोडून चालले आहे. इथली व्यवस्था आपल्यासाठी काही करू शकत नाही. ही व्यवस्था फेल आहे. मी तर जातेय. पण माझ्यानंतर स्नेहलचं काय होणार याची चिंता वाटते”.

डॉ. स्नेहल शिंदे ही पायलची रूम पार्टनर होती. स्नेहलचीही रॅगिंग केली जात असल्याचं समोर आलंय. आत्महत्या करण्यापूर्वी पायलने आई-वडील आणि पतीची माफी मागितली. शिवाय आपल्या व्यवस्थेसमोरही हतबलता व्यक्त केली. आरोपी डॉक्टरांनी कशा प्रकारे त्रास दिला याबाबतही तिने लिहिलं आणि जीवन प्रवास संपवला.

जातीवाचक रॅगिंगला कंटाळून पायलने 22 मे रोजी नायर हॉस्पिटलच्या होस्टेलमध्ये आत्महत्या केली होती. पायलच्या मोबाईलमध्ये तिने लिहिलेली सुसाईड नोट सापडली. पायलने लिहिलेली सुसाईड नोट ही तिच्याच अक्षरात असल्याची खात्री तज्ञांकडून करण्यात आली. यानंतर पोलिसांनी 1203 पानांचं आरोपपत्र दाखल केलंय.

हेमा अहुजा, भक्ती मेहेरे आणि अंकिता खंडेलवाल यांच्याविरोधात ठोस पुरावे सापडले असल्याचं पोलिसांनी आरोपपत्रात म्हटलंय. यासाठी 180 साक्षीदार तपासण्यात आले. हेमा अहुजाने पायलला 4.51 मिनिटांनी फोन केला होता. यानंतर पायलने तिच्या मोबाईलमध्ये सुसाईड नोटचे फोटो 5.04 मिनिटांनी काढले. पायल आणि हेमा अहुजा यांचं संभाषण 121 सेकंद झालं होतं.