मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा 59 वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांकडून जयंत पाटील यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतो आहे. अशावेळी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे भाचे आणि महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी जयंत पाटील यांना खास शुभेच्छा दिल्या आहेत. शुभेच्छा देतानाच एक दिवस आपण या महाराष्ट्राचं नेतृत्व करावं, अशा सदिच्छाही तांबे यांनी व्यक्त केल्या आहे. तांबे यांनी ट्विटरवरुन जयंत पाटलांना या खास शुभेच्छा दिल्या आहेत.(Happy Birthday to Jayant Patil from Satyajit Tambe)
‘काका, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! एक दिवस आपण या महाराष्ट्राचं नेतृत्व करावं याच सदिच्छा’, असं ट्वीट सत्यजित तांबे यांनी केलं आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी जयंत पाटील यांच्यासोबतचा एक फोटोही जोडला आहे.
काका, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !
एक दिवस आपण ह्या महाराष्ट्राचे नेतृत्व करावं ह्याच सदिच्छा. @Jayant_R_Patil pic.twitter.com/uLMyh34beU— Satyajeet Tambe (@satyajeettambe) February 16, 2021
जयंत पाटील यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त सर्वच राजकीय पक्षाच्या नेतेमंडळींकडून शुभेच्छा देण्यात येत आहेत. त्यात उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुनिल तटकरे, मंत्री नवाब मलिक, गृहमंत्री अनिल देशमुख, मंत्री यशोमती ठाकूर, खासदार सुप्रिया सुळे, मंत्री सुभाष देसाई, मंत्री बच्चू कडू, अभिनेता रितेश देशमुख, आमदार धिरज देशमुख, ऊर्जामंत्री नितीन राऊत, सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांत्यासह अनेक नेत्यांनी जयंत पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांचा आज स्मृतीदिन आहे. त्यानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आर. आर. आबांच्या स्मृतीस्थळावरुन जाऊन त्यांना विनम्र अभिवादन केलं आणि आबांच्या स्मृती जागवल्या.
महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री तथा माजी गृहमंत्री स्व. आर. आर. (आबा) पाटील यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन? pic.twitter.com/G6BQg1ovqC
— Jayant Patil (@Jayant_R_Patil) February 16, 2021
गाव, तालुका आणि जिल्हा पातळीवरचे प्रश्न या शिवसंपर्क अभियानाअंतर्गत हाताळली जाणार आहेत. प्रत्येक पदाधिकाऱ्याला संपर्क अभियानाची जबाबदारी वाटून दिली आहे. गावोगावी शिवसेना आणि घराघरात शिवसेना वाढली पाहिजे. सरकारमध्ये अशलो तरी पक्ष संघटना मजबूत झाली पाहिजे, या उद्देशानं हे अभियान राबवण्यात येणार असल्याची माहिती शिवसेनेचे खासदार राजेंद्र गावित आणि आमदार दिलीप लांडे यांनी दिली आहे.
संबंधित बातम्या :
राष्ट्रवादीच्या ‘संवाद यात्रे’ने आघाडीत उलथापालथ?; वाचा स्पेशल रिपोर्ट!
Happy Birthday to Jayant Patil from Satyajit Tambe