मुंबई : देशात सर्वत्र हर घर तिरंगा अभियान राबविण्यात येत आहे. स्वातंत्र्याच्या 75 च्या वर्षानिमित्त राष्ट्रभक्ती जागविण्याचा प्रयत्न केला जात आहे. याचाच एक भाग म्हणून धरणही तिरंगी होऊ लागली आहेत. चार दिवसांपूर्वी केरळातील ईडुक्की (Kerala’s Idukki) धरण तिरंगी झालं होतं. आता मुंबईला पाणीपुरवठा (water flows) करणारं धरणही तिरंगी झालंय. तीन रंगातून पाणी वाहत आहे. हे वाहणारं पाणी पाहून देशभक्तीची (patriotism) भावना अधिकच प्रबळ होताना दिसत आहे. राज्यात सर्वत्र देशभक्तीचा माहौल आहे. घरोघरी तिरंगा फडकविला जात आहे. त्यात आता भर पडली आहे ती धरणांच्या सौंदर्यात. धरणांचे पाणी तीर रंगात करण्याचा कदाचित हा पहिलाच प्रयोग असेल.
#WATCH | Maharashtra: Vaitarna Dam, one of the sources of drinking water to Mumbai, adorned in tricolours to mark #75YearsofIndependence
हे सुद्धा वाचा(Source: BMC) pic.twitter.com/B4gjunfAKq
— ANI (@ANI) August 13, 2022
सोलापुरातील उजनी धरणाचे पाणी सोडताना तीन रंग दिसत आहेत. हिरवा, पांढरा आणि केशरी रंगात पाणी धरणातून खाली पडताना दिसत आहे. हे तीन रंग लक्ष वेधून घेत आहेत. उजनी धरणही चमकत आहे. पुणे व सोलापूर जिल्ह्याच्या सीमेवरील उजनी धरण 104 टीएमची भरले. धरणाची क्षमता 117 आहे. राज्यातील सर्वात मोठ्या धरणांपैकी एक असलेल्या या धरणातून शुक्रवारी रात्री पाणी सोडण्यास आरंभ झाला. स्वातंत्र्याच्याअमृतमहोत्सव निमित्त पाण्यावर अशी तिरंगा रोषणाई केली आहे.
Illumination of Ujani Dam, Solapur in Tricolor#AzadiKaAmritMahotsav pic.twitter.com/nbCDuabepK
— PIB in Maharashtra ?? (@PIBMumbai) August 13, 2022
भंडाऱ्यातील गोसे खुर्द धरणातूनही अशाच प्रकारे तीन रंगात पाणी बाहेर पडताना दिसत आहे. हर घर तिरंगा अभियान राबवत असताना धरणही तिरंगी दिसू लागलीत.
भंडाऱ्यातील गोसेखुर्द धरण तीन रंगात वाहू लागलंय. pic.twitter.com/TrMXbnNVBf
— Govind Hatwar (@GovindHatwar) August 13, 2022