‘हर हर महादेव’ चित्रपटातील हे प्रसंग वगळणार, त्यानंतर टीव्हीवरून होणार प्रदर्शित, संभाजी ब्रिगेडची ‘ही’ होती मागणी

| Updated on: Dec 14, 2022 | 7:23 PM

छत्रपती शिवाजी महाराज, बाजीप्रभू देशपांडे, सरदार कृष्णाजी बांदल यांच्याबाबत अतिशय चुकीचा आणि आक्षेपार्ह इतिहास मांडला होता. त्यामुळे त्याविरोधात संभाजी ब्रिगेडने पुण्यातील चित्रपटगृह बंद पाडली होती.

हर हर महादेव चित्रपटातील हे प्रसंग वगळणार, त्यानंतर टीव्हीवरून होणार प्रदर्शित, संभाजी ब्रिगेडची ही होती मागणी
Follow us on

मुंबईः हर हर महादेव चित्रपटातील दृश्यावरून गेल्या काही दिवसांपासून हा वाद प्रचंड वाढला होता. त्यानंतर राज्यातील विविध संघटनेकडून त्याविरोधात आवाजही उठवण्यात आला होता. तर आता हा चित्रपट टीव्ही दाखवण्यात येणार असल्याने संभाजी ब्रिगेड संघटनेने आक्षेप घेत या चित्रपटातील काही दृश्यांबाबत आक्षेप नोंदवण्यात आले होते. चित्रपटातील वादग्रस्त दृश्य आणि प्रसंगाबाबत संभाजी ब्रिगेडने आक्षेप घेतला होता.

छत्रपती शिवाजी महाराज, बाजीप्रभू देशपांडे, सरदार कृष्णाजी बांदल यांच्याबाबत अतिशय चुकीचा आणि आक्षेपार्ह इतिहास मांडला होता. त्यामुळे त्याविरोधात संभाजी ब्रिगेडने पुण्यातील चित्रपटगृह बंद पाडली होती. तसेच आक्रमक भूमिकासुद्धा घेतली होती.

संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष अॕड. मनोज आखरे यांच्याबरोब या चित्रपटा बाबत चर्चा करून त्यांच्या मार्गदर्शनाखाली ‘हर हर महादेव’ चित्रपटाच्या विरोधात संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून आम्ही ‘सेन्सर बोर्ड’ यांच्याकडे सुद्धा तक्रार केली असल्याचे सांगण्यात आले होते.

तसेच आक्षेपार्ह प्रसंगाबाबत वकिलांमार्फत नोटीससुद्धा पाठवण्यात आल्याने संभाजी ब्रिगेडच्या पाठपुराव्यास यश आले असल्याचे संभाजी ब्रिगेडच्यावतीने सांगण्यात आले होते.

संभाजी ब्रिगेडकडून तक्रार करण्यात आल्यानंतर चित्रपटातील सर्व वादग्रस्त प्रसंग वगळण्याचं झी स्टुडिओ आणि ‘हर हर महादेव’ चित्रपटातील टीमने मान्य केले आहे.

झी स्टुडिओच्या मुंबईतील कार्यालयात आज 14 डिसेंबर 2022 रोजी संभाजी ब्रिगेडच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक झाली होती. संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेश संघटक संतोष शिंदे आणि सहकार्याने याबाबत परखड भूमिका घेत आपली बाजू मांडली होती. म्हणूनच झी स्टुडिओ आणि संभाजी ब्रिगेडच्या भूमिकेत समर्थन देऊन वादग्रस्त प्रसंग वगळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

संभाजी ब्रिगेडच्या या भूमिकेमुळे आता हर हर महादेव चित्रपटातील वादग्रस्त दृश्य वगळण्यात येणार असून त्यानंतरच हा चित्रपट प्रदर्शित केला जाईल असंही झी स्टुडिओनी सांगितले.