मुंबई: राज्यात आरोग्य सेवा भरती घोटाळ्यात मोठा घेटाळा होत असल्याचा आरोप ओबीसी नेता प्रकाश शेंडगे यांनी केला आहे. प्रकाश शेंडगे यांनी महाविकास आघाडी सरकारवर गंभीर आरोप केला आहे. आरोग्य भरतीसंदर्भात मध्यस्थ आणि दलाल यांच्यातील संभाषणाची एक ऑडिओ क्लिप व्हायरल होतं आहे. व्हायरल होत असलेल्या क्लिपची टीव्ही 9 मराठी पष्टी करत नाही. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दलाल घुसल्यामुळेच आरोग्य विभागाची परीक्षा रद्द झाल्याचा संशय व्यक्त केला होता. विद्यार्थ्यांकडे 5, 10 ते 15 लाख रुपयांची मागणी करुन, भरती करण्याचं आश्वासन दिलं जात आहे. त्यामुळे परीक्षा रद्द का झाली याची तर चौकशी व्हायलाच हवी, पण या दलालांचाही शोध घेऊन आवश्यक ती कारवाई करावी, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. आता ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानं शंका वाढल्याचं बोललं जातंय.
भरतीसाठी एजंटमार्फत 15 लाख मागितले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. क्लास डी साठी 6, क्लास बी साठी 13 लाख मागितल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. काम शंभर टक्के होणार, अशी एजंटकडून लोकांना बतावणी करण्यात येत आहे.
हे प्रकरण धक्कादायक आहे. यामध्ये फार मोठा भ्रष्टाचार झाल्याची शक्यता आहे. ऑडिओ क्लिपमध्ये अमरावती जिल्ह्याचा उल्लेख आहे. मात्र व्याप्ती राज्यभर असण्याची शक्यता आहे. क्लिपमध्ये न्यासा कंपनीचा उल्लेख आहे. न्यासा कंपनीचा मालक 84 दिवस तुरुंगात राहून आलेला आहे. काळ्या यादीत टाकलेल्या कंपनीला कंत्राट देण्यात आलं, काय चाललंय नेमकं? या संपूर्ण प्रकरणाची सीआयडी चौकशी झाली पाहिजे.समाजातील सर्व घटकांची मुलं या परीक्षेची तयारी करत होते. या प्रकरणातील झारीतील शुक्राचार्य कोणं हे समोर आलं पाहिजे, अशी मागणी प्रकाश शेंडगे यांनी केली आहे.
प्रकाश शेंडगे यांच्या आरोपात 100 टक्के तथ्य आहे. देवेंद्र फडणवीस यांनी काही दलाल फिरत असल्याचं वक्तव्य केलं होतं.आरोग्य भरतीत महाघोटाळा झाल्याचा आरोप मी केला होता. न्यासा कंपनी नॉट क्वालिफाईड असं लिहिण्यात आलं होतं त्याचा आदेश माझ्याकडं आहे. या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे, असं प्रविण दरेकर म्हणाले.
आरोग्य विभागाच्या परीक्षा पुढे ढकलल्याने राज्यभरातील विद्यार्थ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. मात्र या परीक्षेच्या नियोजनाचं काम ज्या न्यासा कम्युनिकेशन या कंपनीला आरोग्य विभागाने दिल होतं त्या कंपनीच्या अकार्यक्षमतेमुळे परीक्षा पुढे ढकलावी लागली, असं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितलंय. या कंपनीबाबत माहिती घेतली असता ही मूळ दिल्लीची कंपनी असून अशा प्रकारच्या परिक्षांचे आयोजन त्यासोबत परीक्षांचे नियोजन करण्याचं काम ही कंपनी करते.
या कंपनीचे एक कार्यालय मुंबईतील नरिमन पॉइंट इथल्या डालामाल टॉवर या इमारतीत असल्याचं या कंपनीच्या संकेतस्थळावर सांगण्यात आलंय. टीव्ही 9 मराठीच्या टीमने तिथे भेट दिली असता आज मात्र हे कार्यालय बंद असून तिथे कुठल्याही प्रकारचं काम सुरु नाहीये. शिवाय या संकेतस्थळावर देण्यात आले संपर्क क्रमांक देखील बंद आहेत.
इतर बातम्या: