मुंबई : मुंबई (Mumbai) आणि राज्यातील इतर किनारपट्टी भागातील तापमानात (Temperature) मोठी वाढ झाली आहे. मुंबईत 39.4 अंश सेल्सियस कमाल तापमानाची नोंद झाली आहे. हे तापमान सामान्य तापमानापेक्षा जवळपास आठ अंश सेल्सियसने अधिक आहे. त्यामुळे मंगळवारी हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला होता. तर बुधवारी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढील काही दिवस मुंबईत उष्णतेची लाट (Heat Wave) कायम राहणार असून, रात्रीच्यावेळी तापमान 24 अंश सेल्सिअसच्या आसपास राहू शकते, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. सरासरी तापमानात वाढ झाल्यास तसेच मैदानी भागाचे कमाल तापमान 40 अंश सेल्सिअस, डोंगराळ भागातील तापमान 30 अंश सेल्सिअस आणि किनारपट्टी भागातील तापमान 37 अंशांपेक्षा जास्त असल्यास संबधित भागात उष्णतेची लाट आली असे माणण्यात येते. सध्या मुंबईचे तापमान हे 39.4 अंश सेल्सियस नोंदवले गेल्यामुळे उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.
मुंबईसह राज्यातील अनेक भागात उष्णतेची लाट आली आहे. वायव्य भारतातून येणारे उष्ण आणि कोरडे वारे कोकणच्या काही भागात पोहोचत आहेत. यासोबतच महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरून वाहाणाऱ्या वाऱ्याची गती संथ झाली आहे. आकाश देखील स्वच्छ आणि निरभ्र आहे. ही सर्व कारणे उष्णता वाढीसाठी पोषक असल्याने मुंबईसह राज्यात उष्णतेची लाट निर्माण झाली आहे. मुंबईचे तापमान 39.4 अंश सेल्सियसवर पोहोचले आहे.
दरम्यान पुढील काही दिवस मुंबईसह राज्यात उष्णतेची लाट कायम राहणार असून, नागरिकांनी बाहेर फिरताना काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे. शक्यतो दुपारच्या वेळी घरातून बाहेर पडणे टाळा. अत्यावश्यक काम असेल तरच घरातून बाहेर पडा. उन लागू नये यासाठी टोपी किंवा इतर साधनांचा वापर करा. सतत पाणी पित रहावे अशा सूचना करण्यात आल्या आहेत.
Heat Wave to Severe Heat wave conditions over Rajasthan and Heat wave conditions over Jammu Division, Himachal Pradesh, Gujarat State, Konkan, West Madhya Pradesh, Vidarbha, Telangana & Odisha during next 2 days.
— India Meteorological Department (@Indiametdept) March 16, 2022
मुंबईत भररस्त्यात गोळीबाराचा थरार, रेकॉर्डवरील गुन्हेगारावर फायरिंग
चार्जिंगला फोन लावून बायकोशी गप्पा, 25 वर्षीय मुंबईकर तरुणाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू