मुंबई: पावसाळ्यात मुंबईत (Mumbai) कधी किती पाऊस होईल, याचा अंदाज बांधणं कठीण असतं. त्यामुळे मुंबईच्या पावसावर (Heavy Rain) कधी विश्वास ठेवायचा नसतो असंही बोललं जातं. मुंबईचा पाऊस नेहमीच अंदाज लावण्यापलिकडचा असतो. या पावसाळ्यात जोरदार पावसाने मुंबईकरांना अनेकदा झोडपून काढले. यात आता बॉलिवूडच्या सेलेब्रिटींचाही (Bollywood Celebrity) समावेश झाला आहे.
जुहू येथील अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या ‘प्रतीक्षा’ बंगल्यात (Pratiksha Bungalow) देखील पाणी शिरल्याची माहिती मिळत आहे. स्पॉटबॉयमधील वृत्तानुसार बिग बींच्या (Big B) बंगल्यासमोरील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साठले आहे. पाऊस सातत्याने सुरू असल्याने आता हे पाणी बंगल्याच्या परिसरात देखील घूसत आहे. प्रतीक्षा या आपल्या बंगल्यात अमिताभ पत्नी जया प्रदा, मुलगा अभिषेक बच्चन, सुन ऐश्वर्या राय-बच्चन आणि नात आराध्यासह राहतात. पाणी साठल्याने या सर्वांचं घराबाहेर पडणं देखील कठीण झालं आहे.
T 3276 – It pours , but it pours love and affection too .. ! so humbled and so moving .. thank you all ??? pic.twitter.com/ByMhYk7KWD
— Amitabh Bachchan (@SrBachchan) September 1, 2019
अमिताभ दर रविवारी आपल्या घराबाहेर चाहत्यांना बाहेर येऊन भेट देतात. याप्रमाणे त्यांनी या रविवारी देखील आपल्या चाहत्यांची भेट घेतली होती. त्या दिवशी पावसानेही हजेरी लावली होती. त्यानंतर त्यांनी या भेटीबद्दल एक ट्विट केलं. त्यात त्यांनी म्हटलं होतं, “बूंदे बरस रही हैं, लेकिन बरस रहा है प्यार और लगाव भी…! तो बहुत भावुक हो गया हूं. शुक्रिया.”
रेणुका शहाणेंचा गुडघाभर पाण्यातून प्रवास
#MumbaiSpirit in #MumbaiRains Helping each other in times of distress #Mumbaikars ?? pic.twitter.com/qowHlZzyYo
— Renuka Shahane (@renukash) September 4, 2019
बॉलिवूड अभिनेत्री रेणुका शहाणे (Renuka Shahane) यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यात त्या गुडघ्यापर्यंत पाण्यातून मार्ग काढत चालताना दिसत आहे. रेणुका यांनी ‘हम आपके हैं कौन’, ‘सैलाब’, ‘दिल से जिसे अपना कहा’ आणि ‘बकेट लिस्ट’ सारख्या अनेक चित्रपटांमध्ये आपल्या सशक्त भूमिकांनी प्रेक्षकांचं मन जिंकलं आहे. व्हायरल झालेल्या या फोटोत रेणुका शहाणेंनी गुलाबी रंगाचा सूट घातलेला दिसत आहे. रेणुका यांना काही कामानिमित्त आपल्या गाडीतून उतरून चालावे लागल्याचंही सांगितलं जात आहे. मात्र, रेणुका यांची गाडी खराब झाली होती की अन्य काही कारणाने त्यांना इतक्या पाण्यातून चालावे लागले हे अद्याप स्पष्ट नाही.