मुंबई : गेल्या दोन दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने मुंबईसह उपनगरात (Mumbai Rain) पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावली आहे. मुंबईत लोअर परेल, दादर, प्रभादेवी, लालबाग या ठिकाणी विजेच्या कडकडाटांसह मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे अनेक सखल भागात पाणी साचण्यास (water logging in mumbai) सुरुवात झाली आहे. येत्या 24 तासात मुंबईसह रायगड, कोकण, सिंधुदुर्ग या ठिकाणी अतिवृष्टीचा (Mumbai rain live update) इशारा देण्यात आला आहे.
मुंबईसह उपनगरातही बोरीवली कांदीवली, मालाड आणि गोरेगाव या परिसरातही मुसळधार पाऊस (Monsoon Rain in Maharashtra) पडत आहे. अचानक आलेल्या पावसामुळे चाकरमान्यांची ताराबंळ (Mumbai Local update) उडाली आहे. विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस सुरू झाल्याने मुंबईकरांची तारांबळ उडाली आहे. अचानक आलेल्या या पावसाने अक्षरश: झोडपून काढले. अवघ्या काही मिनिटातच अनेक ठिकाणी पाणी साचल्याने (Mumbai Rain) वाहतूक कोंडीचा सामना मुंबईकरांना करावा लागत आहे.
Heavy rainfall today & extremely Heavy Rainfall warning in Mumbai City & Suburbs for the next 24 hrs, issued by #IMD . We request #Mumbaikars to avoid venturing around the sea & into water logged areas. Please take care and be careful. For any assistance #Dial1916
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) September 18, 2019
मुसळधार पावसामुळे मुंबईची लाईफलाईनही विस्कळीत (Mumbai Local update) झाली आहे. ठाणे, नवी मुंबई या ठिकाणच्या मुसळधार पावसामुळे अनेक ट्रान्स हार्बर उशिराने धावत आहे. ठाण्यातून पनवेल, वाशीकडे जाणाऱ्या तसेच पनवेलहून वाशी, ठाण्याकडे येणाऱ्या गाड्या 15 ते 20 मिनिटे उशिराने धावत आहेत.
पालघर परिसरात मुसळधार पावसाने हजेरी लावली. पालघरमधील डहाणू, तलासरी, कासा, मनोर भागात पाऊस सुरु झाला आहे.
येत्या 4 तासात अति मुसळधार पाऊस
पुढील 4 तासात मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर, रत्नागिरी परिसरात अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. तसेच मुंबईत आज रात्रभर पाऊस पडणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आहे. येत्या 20 सप्टेंबरपर्यंत पाऊस सुरु राहणार असल्याचे हवामान खात्याने म्हटलं आहे.