Mumbai : आमदार खासदारांचा बालाजी तिरुपती स्टुडिओत हाय व्होल्टेज ड्रामा, पर्यावरण मंत्र्यांचे कारवाई करण्याचे आदेश

| Updated on: Aug 26, 2022 | 5:22 PM

तिथं आमदार खासदारांनी अधिकाऱ्यांना कारवाई का झाली नाही, हे विचारल्यानंतर काहीवेळ तणाव निर्माण झाला होता. आलेल्या अधिकाऱ्यांना धारेवर धरत कारवाई का झाली नाही याचे उत्तर मागितले.

Mumbai : आमदार खासदारांचा बालाजी तिरुपती स्टुडिओत हाय व्होल्टेज ड्रामा, पर्यावरण मंत्र्यांचे कारवाई करण्याचे आदेश
Mumbai : आमदार खासदारांचा बालाजी तिरुपती स्टुडिओत हाय व्होल्टेज ड्रामा, पर्यावरण मंत्र्यांचे कारवाई करण्याचे आदेश
Image Credit source: tv9marathi
Follow us on

मुंबई : मुंबईच्या (Mumbai) मालाड मारवे (Malad Marwe) येथील बालाजी तिरुपती स्टुडिओत (Balaji Tirupati Studio) हाय व्होल्टेज ड्रामा रंगला आहे. आमदार अतुल भातखळकर, खासदार गोपाळ शेट्टी, आमदार योगेश सागर, यांच्यासह माजी खासदार आणि भारतीय जनता पार्टीचे नेते किरीट सोमय्या हे मालाड मारवे येथील चित्रपट स्टुडिओत अचानक तिथे पोहचले त्यामुळे तिथली परिस्थिती चिघळली असल्याची माहिती मिळाली आहे. आमदार आणि खासदारांसोबत महापालिका अधिकारी, सीआरझेडचे अधिकारी त्याचबरोबर वनखात्याचे अधिकारी देखील उपस्थित असल्याची माहिती मिळाली आहे. मालाड मार्वे येथील हा स्टुडिओ अनधिकृत असून सर्व कायद्यांचे उल्लंघन केलेले आहे. याबाबत अतुल भातखळकर यांनी विधानसभेत आवाज उठवला होता, यावर पर्यावरण मंत्र्यानी कारवाईचे आदेश दिले होते. मात्र एवढं असूनही या स्टुडिओत मोठ्या प्रमाणात चित्रीकरण सुरू असल्याने आमदार खासदारांनी नाराजी व्यक्त केली आहे.

काहीवेळ अधिकाऱ्यांचा गोंधळ उडाला होता

तिथं आमदार खासदारांनी अधिकाऱ्यांना कारवाई का झाली नाही, हे विचारल्यानंतर काहीवेळ तणाव निर्माण झाला होता. आलेल्या अधिकाऱ्यांना धारेवर धरत कारवाई का झाली नाही याचे उत्तर मागितले. पोलीस प्रशासन सोबत असताना, स्टुडिओच्या आतमध्ये येण्यास मज्जाव केल्यामुळे सरकारी कामात अडथळा आणला याबाबत पोलिसात तक्रार करणार असल्याचे गोपाळशेट्टी यांनी सांगितले. सुमारे दोन तास सुरू असलेल्या हाय व्होल्टेज ड्रामा अधिकाऱ्यांनी कारवाईचे आश्वासन दिल्यावर सर्व नेते मंडळी तिथून निघाली असल्याची माहिती मिळाली आहे.

याबाबत सर्वकष चौकशी होण्याची गरज

महापालिका सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी पुढील काही तासात हा स्टुडिओ बंद करण्यात येईल अशा प्रकारचे आदेश देतो असे सांगितले. या स्टुडिओ बाबत किरीट सोमय्या यांनी बोलताना हा अनधिकृत स्टुडिओ उभारण्यासाठी आघाडी सरकारमधील आदित्य ठाकरे आणि असलम शेख यांचा दबाव असल्याचा आरोप केला. तर फक्त सहा महिन्यांची तात्पुरती चित्रीकरणाची परवानगी असताना एवढे मोठे स्टुडिओ बिनधास्तपणे उभे कसे राहिले याबाबत सर्वकष चौकशी होण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले.