मुंबईः राज्यात वेगवेगळ्या गोष्टीवरून राजकारण आणि वाद चालू असतानाच कालिचरण महाराज यांनी ाज एक वादग्रस्त विधान केले आहे. हिंदू धर्मातील देव-देवता हिंसक असल्याचे सांगत त्यांनी खून करणे वाईट नाही जर धर्मासाठी आणि देशासाठी असेल तर असं वक्तव्य त्यांनी केल्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. कालिचरण महाराज यांनी एका जाहीर कार्यक्रमात खून करण्याचं समर्थन केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे आता वाद उफाळून येण्याची शक्यता आहे.
कालिचरण महाराज एका जाहीर कार्यक्रमामध्ये बोलताना त्यांनी हिंदू धर्मातील देव देवातांचे दाखल दिले आहेत. ते दाखले देत असताना त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, गुरु गोविंदसिंग महाराज, राणा प्रतापसिंह महाराज यांनी मारामाऱ्या केल्या नसत्या तर आपण त्यांना पुजले असता का असा सवाल त्यांनी आपल्या भक्तांना केला आहे.
आपले हिंदू देव देवता हिंसक असल्यानेच आपण त्यांना पूजा करतो असंही त्यांनी सांगितले. हिंदू धर्मातील देव देवतांन आपल्यासाठी मारामाऱ्या केल्या नसत्या तर आपण त्यांना पूजले असते का असा सवाल करून त्यांनी धर्मासाठी आणि देशासाठी खून करणे वाईट नाही असंही त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे.
देशात एकीकडे धर्मावरून वाद वाढत असतानाच कालिचरण महाराज यांनी अशी वादग्रस्त वक्तव्य केल्याने त्यांच्या वक्तव्याचे काय पडसाद उमटतील याचीही चिंता व्यक्त केली जात आहे.
कालिचरण महाराज यांनी हिंदू देव-देवतांची नाव घेत असतानाच त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचाही उल्लेख त्यांनी हिंसक केला आहे.
तर दुसरीकडे धर्मासाठी आणि देशासाठी खून केले तर काही वाईट असं त्यांनी हत्येचं समर्थन केले आहे. त्यामुळे कालिचरण महाराज यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे वाद उफाळून येण्याची शक्यता आहे.