वसई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा देशासह राज्यात गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्यात येत आहे (Vasai Ganesh visarjan). त्यासोबतच गणेशाची मूर्तीस्थापना आणि गणेश विसर्जन वेळी गर्दी होऊ नये यासाठी सरकारकडून काही नियमावली जारी करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर वसईत हितेंद्र ठाकूर यांच्या संकल्पनेतून गणेश विसर्जनासाठी ‘तलाव आपल्या घरी’ ही संकल्पना राबवण्यात येत आहे (Vasai Ganesh visarjan).
कोरोनाच्या महामारीत गणेशाची मूर्तीस्थापना किंवा गणेश विसर्जन वेळी गणेशभक्तांची गर्दी वाढू नये, गणेशोत्सवामध्ये कोणीही घराबाहेर पडू नये, सार्वजनिक ठिकाणी अथवा विसर्जनस्थळावर गणेशभक्तांची गर्दी होऊ नये, गर्दीतून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष तथा आमदार हितेंद्र ठाकूर, आमदार क्षितिज ठाकूर यांच्या संकल्पनेतून यंदाच्या वर्षी वसई ताल्युक्यात 72 कृत्रिम फिरते तलावाची व्यवस्था केली आहे.
प्रत्येक प्रभागनिहाय ‘तलाव आपल्या घरी’ ही संकल्पना राबविण्यात येत आहे. गणेशभक्तांच्या सेवेसाठी बविआचे सर्व कृत्रिम फिरते तलाव वाहनांवर सज्ज झाले आहे. ज्या गणेश भक्तांनी आपल्या गणेश मूर्तींची नोंदणी स्थानिक माजी नगरसेवक, संबधित बविआ कार्यकर्ते यांच्याकडे केली आहे त्यांच्या घरोघरी जाऊन त्यांच्याच सोसायटीत सर्व विधी करून गणेशाचे विसर्जन करणार आहे.
दरम्यान, मुंबई महापालिकेतर्फेही संपूर्ण शहरातील प्रत्येक भागात कृत्रिम तलाव तयार केले जाणार आणि फिरत्या कृत्रिम तलावांची व्यवस्थाही केली जाणार आहे. त्यासोबत या तलावाशेजारी गर्दी होऊ नये म्हणून येथे स्थानिक प्रशासनाकडून व्यवस्थापन केले जाणार आहे.
संबंधित बातम्या :
प्रशासनाला साथ, औरंगाबादमध्ये 577 तर विरार परिसरात 181 मंडळांचा गणेशोत्सव रद्द
कोल्हापुरात कोरोना सेंटरमध्ये गणरायाचे आगमन, मंत्री हसन मुश्रीफांच्या हस्ते प्रतिष्ठापना