Best Scooter In India: भारतीय बाजारात अनेक कंपन्यांच्या स्कूटर आहेत. बहुतांशी लोक ज्यास्त मायलेज जास्त आहे आणि किंमत कमी अशी स्कूटर घेणे पसंद करतात. होंडा एक्टीव्हा आणि टीव्हीएस ज्युपिटर दोन्ही स्कूटर या बाबतीत सरस आहेत. दोन्ही स्कूटर भारताच्या मोस्ट सेलिंग स्कूटर आहे. होंडा एक्टीव्हा आणि टीव्हीएसच्या या मॉडेलची क्रेज सर्वात जास्त आहे. भारतात वाहन निर्मितीचे मार्केट मोठे असून आपण जपानला मागे टाकले आहे.
होंडा एक्टीव्हा एक उत्तम मायलेज देणारी टु- व्हीलर आहे. या स्कूटरमध्ये 4-स्ट्रोक SI इंजिन लावण्यात आले आहे. या स्कूटरच्या इंजिनसोबत ऑटोमॅटीक (V-matic) ट्रान्समिशनशी जोडलेला आहे. होंडा एक्टीव्हामध्ये इंजिनातून 5.77 kW पॉवर मिळते आणि 8.90 Nm चा टॉर्क जनरेट होतो. होंडाच्या या स्कूटरमध्ये 1260 mm चा व्हीलबेस आणि 162 mm चा ग्राऊंड क्लिअरेन्स दिलेला आहे.
होंडा एक्टीवा स्कूटरचा मायलेज 51.23 kmpl इतका आहे. तर या स्कूटरच्या इंधनाच्या टाकीची क्षमता 5.3 लिटर आहे. ज्यामुळे एकदा टाकी फूल केल्यानंतर 270 किलोमीटरपर्यंत स्कूटर धावू शकते. होंडाच्या या स्कूटरची दिल्लीतील एक्स-शोरुम किंमत 76,684 रुपयांपासून सुरु होऊन 82,684 रुपयांपर्यत जाते. देशातील इतर शहरात होंडा एक्टीवाची किंमत भिन्न आहे.
टीव्हीएस ज्युपिटर स्कूटरमध्ये सिंगल सिलेंडर 4-स्ट्रोक इंजिन बसविण्यात आलेले आहे. या स्कूटरमध्ये लावलेल्या इंजिनातून 6,500 rpm वर 5.9 kW इतकी पॉवर मिळते आणि 5,000 rpm वर 9.8 Nm टॉर्क जनरेट होतो. या स्कूटरमध्ये CVT ऑटोमॅटिक ट्रान्समिशन लावलेले आहे. या स्कूटरच्या फ्रंटला 220 mm चे डीस्क ब्रेक आणि रिअरमध्ये 130 mm चे ड्रम ब्रेक लावण्यात आलेले आहेत.
टीव्हीएस ज्युपिटरची ARAI सर्टीफाईड मायलेज 53 kmpl इतकी आहे. ही स्कूटर 5.1 लिटर इंधन क्षमतेची टाकी आहे. त्यामुळे एकदा टाकी पू्र्ण भरल्यानंतर 270 किलोमीटर पर्यंतचा प्रवास करता येतो. टीव्हीएस ज्युपिटरची एक्स शोरुम किंमत 74,691 रुपयांपासून सुरु होते.
होंडा एक्टीव्हा आणि टीव्हीएस ज्युपिटर या दोन्ही स्कूटरचे मायलेज पाहाता दोन्ही स्कूटरचे मायलेज 50 kmpl च्या बरोबर आहे.तसेच दोन्ही स्कूटरची किंमतही जास्त फरक नाही. स्कूटरचा लुक आणि कलर दोन्ही पाहून दोन्ही पैकी कोणतीही स्कूटर खरेदी करु शकता.