मुंबई : बिहारच्या छपरा जिल्ह्यात विषारी दारू प्यायल्याने मृत्यू पावलेल्यांची संख्या आता 70 च्या पुढे गेली आहे. 25 जणांना अंधत्व आले आहे. दारूबंदी असलेल्या राज्यात कशी काय दारु पोहचतेय, यावर प्रशासनाने ठरविले तर मुंगीपण शिरू शकत नाही, लाॅकडाऊनच्या वेळी कसा कायदा पाळला जात होता. एकाची तरी हिंमत व्हायची का बाहेर पडायला असा सवाल ग्रामस्थांनी करीत प्रशासनाला जबाबदार ठरविले आहे. दरम्यान, दारूकांडातील पीडीत कुटुंबियांना सरकारने आर्थिक नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी होत आहे.
अधिनियमात जर नुकसान भरपाई देण्याची तरदूत आहे तर बिहार विषारी दारूकांडातील पीडीतांना सरकार नुकसान भरपाई का देत नाही अशी जोरदार टीका भाजपाने केली आहे. त्यामुळे विरोधी पक्षांच्या सुरात आता सरकारमध्ये सहभागी काँग्रेस आणि डाव्यांनी आता नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे. तर, विषारी दारू पिणे आणि विकणे हे दोन्ही गुन्हे असल्याने नुकसान भरपाई देण्याचा प्रश्नच उत्पन्न होत नसल्याचे बि्हारच्या दारूबंदी खात्याच्या मंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे ज्या घरातील कर्ते पुरुष या घटनेत बळी गेले आहेत, त्यांच्यासमोर उर्वरित आयुष्य कसे काढायचे असा सवाल आवासून उभा राहीला आहे.
बिहारच्या दारूकांडाचा तपास करण्यासाठी एसआयटीची स्थापना केली आहे. या टीमचे नेतृत्व अॅडीशनल एसपी करणार आहेत. एसआयटीमध्ये 31 पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश असणार आहे. यात तीन डीसीपी दर्जाचे अधिकारी असणार आहेत. सारणचे अधिकारी राजेश मीणा यांनी म्हटले आहे की गेल्या 48 तासांत जिल्हाभर छापे मारीत 126 दारू व्यापारी पकडले आहेत, चार हजार लिटर दारू जप्त केली आहे. या प्रकरणात काही जणांना अटकही झाली आहे.
प्रशासनाने ठरविले तर विषारू दारू राज्यात येऊच शकत नाही असा आरोप सर्वसामान्यांनी केला आहे. ‘जो दारू पिणार तर तो मरणारच असे बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी वक्तव्य केल्याने ते वादात सापडले आहे. दारूबंदीने लोकांचा फायदाही झाला आहे, आम्ही समाजसुधार मोहीम चालविली आहे. आम्ही महात्मा गांधीजीच्या पावलांवर पाऊल ठेवून चाललो आहोत, आम्ही जनतेचे प्रबोधन करीत आहोत असेही नितीशकुमार म्हटले आहेत. त्यांच्यावर त्यांचे एकेकाळचे सहकारी असलेले माजी उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांनी टीका करीत विधानसभेची नितीशकुमार यांनी माफी मागावी असे म्हटले आहे. त्यांनी दारूबंदीला आमचा विरोध नाही, परंतू अशाप्रकारे संपूर्ण शहराला छावणी बनवणे योग्य नसल्याचे सुशीलकुमार मोदी यांनी म्हटले आहे.