मुंबईः स्वप्ननगरी मुंबईत(Mumbai)तुमचा ही एक कोटींचा आशियाना होऊ शकतो. एक कोटींच्या बजेटमध्ये मुंबईत हक्काची मालमत्ता (Property)नावावर होऊ शकते. सेंट्रल मुंबईत स्टुडियो अपार्टमेंटपासून ते दुरवरच्या उपनगरांमधील वन बीएचके फ्लॅटचे पर्याय ग्राहकांसमोर उपलब्ध आहेत. जर नशीब जोरावर असेल तर दहिसर, बोरीवली आणि मुलुंड सारख्या छोटया व्यावसायिक मालमत्तांचा पत्ता तुमचा असू शकतो. मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी आहे आणि या महानगरात एखाद्या कोटीत अपार्टमेंट शोधणे सोप्प काम तर मुळीच नाही. परंतू, मुंबई मेट्रोपोलियन रीजनमध्ये ग्राहकांना अनेक पर्याय सहज उपलब्ध आहेत. मुंबईच्या प्रादेशिक पट्टयात ( MMR) ठाणे, नवी मुंबई, कल्याण आणि डोंबिवलीचा सहभाग आहे. मुख्य शहरापासून काही अंतरावरील परिसरात मालमत्तांच्या दरात कमालीची तफावत आणि दरात कपात आढळते.
जर तुम्ही एक कोटींमध्ये मुंबईतील अपार्टमेंटमध्ये वन बीएचके फ्लॅट शोधत असाल तर उपनगराशिवाय तुमचा गाडा दुसरीकडे वळवू नका. कारण उपनगरातील प्रॉपर्टीचा पर्यायच तुमच्यासाठी उत्तम आहे. ठाणे, नवी मुंबई, कल्याण आणि डोंबिवली यासारख्या परिसरात 5,000 ते 15,000 रुपये प्रति चौरस फुटाच्या दरम्यान ग्राहकाला सहजतेने निवासी मालमत्ता हुडकता येईल. ही मालमत्ता मलाड, कांदिवली पूर्व आणि ठाण्यात सहज उपलब्ध होईल. या परिसरातील प्रतिष्ठित मालमत्ता विकासकांच्या मालमत्तांचाही यामध्ये समावेश आहे. या मालमत्तांमध्ये दर्जेदार सोयी-सुविधा आणि बांधकामाच्या गुणवत्तेची हमी मिळते.
जर तुम्ही जुहू, खार वा बांद्रा सारख्या आलिशान परिसरात राहु इच्छिता तर तुम्हाला एक कोटींमध्ये स्टुडियो अपार्टमेंट मिळेल. अंधेरी, सांताक्रुझ आणि विलेपार्ले सारख्या परिसरात स्टुडियोचा सरासरी कार्पेट एरिया हा 180 ते 200 चौरस फूट इतका आहे. बोरवली, कांदिवली आणि मलाड परिसरात स्टुडियो अपार्टमेंट 250 ते 300 चौरस फुटाचे आहेत.
ग्राहकाला ठाणे, नवी मुंबई आणि आजुबाजूच्या परिसरात हक्काचे घर हवे असेल तर त्याला 3 बीएचके अपार्टमेंट पण मिळू शकते. मुख्य शहरापासून काही अंतरावर मालमत्तांच्या दरात कमालीची तफावत आणि दरात कपात दिसून येईल. नाईट फ्रँक इंडियाने मालमत्ता दर आणि घर विक्रीविषयी केलेल्या सर्व्हेक्षणात, मुंबईतील एकूण मालमत्ता नोंदणीत एक कोटी रुपये आणि त्याहून कमी डीलची 46 टक्क्यांहून जास्तीची हिस्सेदारी असल्याचे म्हटले आहे. मे महिन्यात मुंबईत 9,523 युनिट्सचे रजिस्ट्रेशन करण्यात आले आहे. या डीलच्या माध्यमातून राज्याच्या महसुलात 709 कोटी रुपयांची भर पडली आहे. मुंबई शहरातही एक कोटींच्या घरात घर खरेदीची संधी उपलब्ध होते, पण त्यासाठी ग्राहकाला जुन्या इमारतींचा आधार घ्यावा लागेल.