मुंबई : ग्रामपंचायत निवडणुकीवरून कोणत्या पक्षानं किती जागा जिंकल्या यावर दावे-प्रतिदावे केले जात आहेत. आमच्या पक्षानं जास्तीत-जास्त ग्रामपंचायती जिंकल्याचा दावा केला जात आहे. पावणेदोनशे जागा काँग्रेसनं जिंकल्या आहेत. गावनिहाय आकडे लवकरचं जाहीर करणार असल्याचं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले. माध्यमांना खोटी माहिती देऊन भाजप स्वतःची पाठ थोपाटून घेण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला.
जुन्नर तालुक्यातील शेतकऱ्यानं आत्महत्या केली. तुम्ही तुमच्या शान बानमध्ये असल्याचं शेतकऱ्यानं पंतप्रधानांना लिहीलंय. तेही पंतप्रधानांच्या वाढदिवशी, असा आरोपही नाना पटोले यांनी केला. मी तुमच्या वाढदिवशी आत्महत्या करतो. यानंतर तरी तुम्ही लक्षात ठेवालं, असंही शेतकऱ्यानं चिठ्ठीत लिहिल्याचं पटोले म्हणाले.
राज्यात अतिवृष्टी झाली. धान, कांदा, कापूस, सोयाबीन अशी बरीच पिकं उद्धस्त झाली. शेतकरी देशोधडीला निघाला. पण, अद्याप मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहचली नाही.
तीन हजार कोटी रक्कम शेतकऱ्यांना दिल्याचं राज्य सरकारनं अधिवेशनात जाहीर केलं. शेतकऱ्यांना आधार मिळेल, असं वाटत होतं. पण, जिल्हाधिकाऱ्यांना विचारल्यावर ते अद्याप पैसे आले नसल्याचं सांगतात. ही खोटारडी काम राज्यात ईडीचं भाजपच सरकार करतंय, असा आरोपही पटोले यांनी केला.
रस्त्यांना पडलेले खड्डे अद्याप बुजविण्यात आले नाहीत. त्यामुळं अपघाताचं प्रमाण वाढलं आहे. रस्त्यावरील खड्डे ताबडतोब दुरुस्त करावे, अशी मागणी नाना पटोले यांनी केली.
अद्याप पालकमंत्र्यांची नियुक्ती झाली नाही. त्यामुळं जिल्ह्यातील विकासाची कामं थांबली आहेत.प्रकल्प गुजरातकडं वळविली जात आहेत. वरून गुजरात काय पाकिस्तान आहे का, असा सवाल केला जातो. त्यामुळं राज्यातील मंत्री गुजरातच्या मंत्रिमंडळात काम करतात का, असा सवालही त्यांनी विचारला.