मुंबई : जगभरातून दहशतवादचा संपविण्यासाठी युनायटेड नेशन्स सेक्युरिटी काऊन्सिलतर्फे विशेष कार्यक्रमाचा आयोजन ताज हॉटेलमध्ये आज करण्यात आलं. या कार्यक्रमात 26 /11 दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना आदरांजली वाहण्यात आली. मात्र दहशतवाद संपविण्यासाठी स्थानिक स्तरावर अतिरेक्यांना मिळणारी आर्थिक मदत रोखण्यासाठी चर्चा सत्राचं आयोजन करण्यात आलं. केंद्रीय परराष्ट्र मंत्री एस जयशंकर प्रसाद हे या कार्यक्रमाला उपस्थित होते. युएनचे अनेक पदाधिकारी ही कार्यक्रमात उपस्थित होते. केंद्रीय परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी दहशतवाद रोखण्यासाठी 5 महत्त्वाचे मुद्दे सांगितले.
दीपिका रोटवन ही 26/11 च्या हल्ल्यातील पीडित आहे. आज दहशतवादी विरोधात झालेल्या चर्चा सत्रामध्ये 26 /11 हल्ल्यातील पीडित दीपिका रोटवन ही देखील उपस्थित होती. दीपिकाने आपली व्यथा किंवा तिच्यासोबत झालेला प्रकार आज यूएनच्या मंचावर बोलून दाखवला.
मात्र दीपिकाचं एवढं म्हणणं आहे की, दहशतवाद विरोधात लढा सुरू ठेवणं गरजेचे आहे. ती स्वतः शिक्षा पूर्ण करून आयपीएस अधिकारी बनण्याची तयारी करत आहे. तिला दहशतवादाचा खात्मा करता येणार आहे. वैयक्तिक स्तरावर ती पिढीत आहे. मात्र सरकारने पीडित म्हणून तिला काही मदत देण्याच्या आश्वासन दिलं होतं. पण दुर्दैवाने तो अद्याप पूर्ण झालेलं नाही. दीपिका रोटवन आपला स्वतःचा प्रश्न बाजूला सारत दहशतवाद कसं संपणार यावर चर्चा करत आहे.