माहुलमधील प्रदूषण भोवले, HPCL, BPCL सह चार कंपन्यांना 286 कोटींचा दंड

| Updated on: Aug 15, 2020 | 10:17 AM

मोठ्या ऑइल कंपन्यांचे प्रकल्प असल्यामुळे माहुलमध्ये वायू प्रदूषण होत असल्याची तक्रार हरित लवादाकडे नोंदवण्यात आली होती.

माहुलमधील प्रदूषण भोवले, HPCL, BPCL सह चार कंपन्यांना 286 कोटींचा दंड
Follow us on

मुंबई : मुंबईतील माहुलमधील प्रदूषण बीपीसीएल, एचपीसीएलसह चार कंपन्यांना भोवलं आहे. माहुल गावातील प्रदूषणासाठी चार कंपन्यांना 286 कोटी रुपयांचा दंड राष्ट्रीय हरित लवादाने ठोठावला आहे. (HPCL, BPCL and 2 other firms fined Rs 286 crore for Mahul pollution)

माहुल हे ईशान्य मुंबईतील जुने गाव आहे. या ठिकाणी मोठ्या ऑइल कंपन्यांचे प्रकल्प आहेत. कंपन्यांमुळे माहुलमध्ये वायू प्रदूषण होत असल्याची तक्रार हरित लवादाकडे नोंदवण्यात आली होती.

लवादाने एजिक लॉजिस्टिक, एचपीसीएल, बीपीसीएल आणि सी लॉर्ड या चार कंपन्यांना दणका दिला आहे. चार कंपन्यांना पुढील पाच वर्षात एकूण 286 कोटी रुपयांचा दंड भरण्याचे आदेश राष्ट्रीय हरित लवादाने दिले आहेत. हवेचा दर्जा सुधारण्यासाठी दंडातून रक्कम खर्च करण्यात येणार आहे.

माहूल आणि आंबापाडा गावातील रहिवाशांनी 2014 मध्ये कंपन्यांविरोधात तक्रार केली होती. आपल्या घरापासून काही मीटर अंतरावर कंपन्यांची युनिट असल्याचे गावकऱ्यांनी तक्रारीत म्हटले होते. श्वसनाचे त्रास झाल्याचेही तक्रारदार रहिवाशांनी नमूद केले होते.

कुठल्या कंपनीतून किती अस्थिर सेंद्रिय रसायने (Volatile Organic Chemicals) बाहेर पडली आणि त्याचे संभाव्य परिणाम लक्षात घेऊन दंडाची रक्कम ठरवण्यात आली आहे.

कोणाला किती दंड?

एजिक लॉजिस्टिक – 142 कोटी
एचपीसीएल – 76.5 कोटी
बीपीसीएल – 67.5 कोटी
सी लॉर्ड – 20 लाख

(HPCL, BPCL and 2 other firms fined Rs 286 crore for Mahul pollution)