नव्या वर्षा या ट्रेनचे डब्बे एलएचबी होणार, काय आहेत एलएचबीचे फायदे ? वाचा

| Updated on: Dec 15, 2022 | 5:04 PM

आयसीएफच्या पारंपारीक कोचची निर्मिती 2016 पासून रेल्वे बोर्डाने बंद केली असून आता प्रत्येक ट्रेनला आधुनिक तंत्रज्ञानाचे हलके पण मजबूत ‘एलएचबी’ तंत्रज्ञानाचे डबे जोडले जात आहेत. त्यामुळे प्रत्येक डब्यांमागे प्रवासी वाहून नेण्याची क्षमता वाढत आहे.

नव्या वर्षा या ट्रेनचे डब्बे एलएचबी होणार, काय आहेत एलएचबीचे फायदे ? वाचा
lhbcoach
Image Credit source: lhbcoach
Follow us on

मुंबई : रेल्वेने मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते हैदराबाद धावणाऱ्या हुसेनसागर एक्स्प्रेसला ( ट्रेन क्र.12701 /12702 ) ला तसेच मुंबई सीएसएमटी हैदराबाद सुपरफास्ट एक्स्प्रेसला ( ट्रेन क्र.22732/22731 ) नवे अत्याधुनिक एलएचबी कोच जोडण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवाशांचा प्रवास सुरक्षित आणि वेगवान होणार आहे.

ट्रेन क्र.12702 हैदराबाद – मुंबई सीएसएमटी हुसेनसागर एक्स्प्रेसला 3 फेब्रुवारी 2023 पासून तीन एसी टू टीयर, सात एसी थ्री टीयर, दोन स्लीपर क्लासचे, दोन जनरल सेंकड क्लासचे डब्बे आणि एक एसएलआर आणि एक पॉवर कार अशा सोळा डब्यांसोबत धावणार आहे.

ट्रेन क्र. 12701 मुंबई सीएसएमटी – हैदराबाद एक्सप्रेसला 2 जानेवारी 2023 पासून एलएचबीचे सोळा डब्बे जोडण्यात येणार आहेत. ट्रेन क्र. 22731 हैदराबाद – मुंबई सीएसएमटीला 1 फेब्रुवारी 2023 पासून एलएचबीचे सोळा डब्बे जोडले जातील. ट्रेन क्र.22732 मुंबई सीएसएमटी – हैदराबाद सुपरफास्ट एक्स्प्रेसला 4 फेब्रुवारीपासून एलएचबीचे सोळा डब्बे जोडले जातील.

ट्रेन क्र. 12791 सिंकदराबाद – दानापूर एक्सप्रेसच्या एलएचबी डब्यांच्या कंम्पोझिशनमध्ये बदल होणार असून ही गाडी 17 एप्रिल 2023 पासून दोन एसी टू टीयर, सात एसी थ्री टीयर, स्लीपर क्लासचे आठ कोच, जनरल सेंकड क्लासचे दोन डब्बे, एक एसएलआर, एक एसी बफेट कार आणि एक पॉवरकार असे डब्याची बदललेली स्थिती असणार आहे. परतीच्या ट्रेन क्र. 12792 ला 19 एप्रिल 2023 पासून 22 डब्यांची असणार आहे. तर हैदराबाद रक्सॉल साप्ताहिक एक्स्प्रेस ट्रेन क्र. 17005 येत्या 20 एप्रिल 2023 पासून एलएचबीच्या 22 डब्यांच्या संगतीने चालविली जाणार आहे. परतीची ट्रेन क्र.17006 ही 23 एप्रिल 2023 पासून एलएचबीच्या 22 डब्यांच्या संगतीने धावणार आहे.

आयसीएफच्या पारंपारीक कोचची निर्मिती 2016 पासून रेल्वे बोर्डाने बंद केली असून आता प्रत्येक ट्रेनला आधुनिक तंत्रज्ञानाचे हलके पण मजबूत ‘एलएचबी’ तंत्रज्ञानाचे डबे जोडत आहे. त्यामुळे प्रत्येक डब्यांमागे प्रवासी वाहून नेण्याची क्षमता वाढत आहे. एलएचबी डबे जर्मन तंत्रज्ञानाचे असून ते लोखंडाऐवजी स्टेनलेस स्टील पासून बनलेले आहेत.

दोन ट्रेनची टक्कर जरी झाली किंवा रूळांवरून ट्रेन घसरली तरी या हलक्या डब्यांमुळे कमी जीवितहानी होते. हे डबे दर ताशी 130 कि.मी. वेगाने धावण्याच्या क्षमतेचे असतात. एलएचबी डबे पारंपारिक डब्यांपेक्षा 1.7 मीटरने लांब असल्याने त्यात जादा प्रवाशांना बसता येते.

रेल्वेच्या पारंपारिक डब्यांची दर 18 महिन्याला मेन्टेनन्स करावे लागते. तर नव्या एलएचबी डब्यांना दोन वर्षांतून एकदा मेन्टेनन्ससाठी कारखान्यात पाठवावे लागते. तसेच हे डबे नव्या थ्री फेज तंत्राचे असल्याने ‘हेड ऑन जनरेशन’साठी (ओएचईच्या वीजेवर डब्यातील वीज उपकरणे चालविणे ) अत्यंत योग्य असतात. आयसीएफचे जुने पारंपारिक कोच टू फेजचे असल्याने त्यात ‘हेड ऑन जनरेशन’ तंत्र वापरण्यासाठी सर्कीट बदल करावा लागतो. नव्या तंत्रज्ञानाच्या एलएचबी डब्यांसाठी हे ‘हेड ऑन जनरेशन’ तंत्र लागलीच वापरता येते.