मुंबई : अखिल भारतीय मराठा महासंघाच्या (Maratha Mahasangh) नवीन इमारतीचा भूमीपूजन सोहळा आज पार पडला. या सोहळ्याला माजी राज्यपाल डी वाय पाटील, ज्येष्ठ विधीज्ञ उज्ज्वल निकम (Ujjwal Nikam), मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. यावेळी उज्ज्वल निकम यांनी आपल्या छोटेखानी भाषणात मराठा समाजाने काढलेल्या मोर्चाची स्तुती केली. तसंच मी न घाबरणारा मराठा आहे, असंही उज्ज्वल निकम म्हणाले.
वकिलाला भाषणाची सवय नसते आणि फुकट तर वकील बोलतच नाही. मराठा समाजाची पैशाची श्रीमंती कमी असेल, पण मनाची श्रीमंत मोठी आहे. कोणीही या वास्तूकडे वाकड्या नजरेने बघणार नाही. कोपर्डी घटनेनंतर दाखवून दिलं की मराठा समाज शांत आहे. मोर्चे कसे काढावेत हे दाखवून दिलं. मी न घाबरणारा मराठा आहे, असं उज्ज्वल निकम म्हणाले.
दरम्यान यावेळी मंत्री एकनाथ शिंदे यांनीही मराठा समाजाचे हक्क मिळत नाही तोपर्यंत शांत बसणार नाही, अशी ग्वाही दिली.
कोरोनाचे संकट आहे , नियमांचं पालन झालं पाहिजे. मराठा महासंघाची ही वास्तू उभी राहत असून, 120 वर्ष जुनी परंपरा असलेला महासंघ आहे. समाजाच्या हक्कासाठी आंदोलनं झाली, सर्वजण रस्त्यावर उतरले होते. मराठा समाजाचा हक्क मिळेपर्यंत स्वस्त बसणार नाही, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
कोरोना रुग्ण संख्या आता हळूहळू पुन्हा थोडी वाढत आहे. सर्व अनलॉक झालं आहे. सर्वांनी काळजी घ्या. दुसऱ्या लाटेच्या वेळी ऑक्सिजन कमतरता भासली होती. सर्व नियमांचं पालन करा, असं आवाहन एकनाथ शिंदे यांनी केलं.
संबंधित बातम्या
जनरेशनला नावं ठेवताना बाबा कायम मोबाईलमध्येच, विश्वास नांगरे पाटलांच्या मुलीकडून ‘पोलखोल’
व्हॉट्सअॅप चॅट उत्तम पुरावा असू शकत नाही : उज्ज्वल निकम
कसाबसह 37 गुन्हेगारांना फासापर्यंत पोहोचवणाऱ्या उज्ज्वल निकम यांच्यावर बोयपिक