मुंबई : शिंदे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी प्रत्युत्तर दिलंय. नारायण नाणे तुम्ही केंद्रातले मंत्रीपद पुढील चार महिने टिकते का, याची काळजी घ्या, असा सल्ला दिला. विनायक राऊत म्हणाले, नारायण राणे हे स्वार्थी आणि सत्तालंपट आहेत. अशा माणसाच्या वक्तव्याकडं आम्ही फारसं गांभीर्यानं घेत नाही. केवळ सत्तेसाठी त्यांनी शिवसेनेशी बेईमानी केली. काँग्रेसशी बेईमानी केली. आता देवेंद्र फडणवीस यांना शिव्या घालून मोकळा झालाय. नरेंद्र मोदी यांना शिव्या घालून मोकळा झालाय. अशी टीकाही विनायक राऊत यांनी केली.
नारायण राणे आपलं अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करायची. त्यांनी स्वताच्या अस्तित्वाची काळजी घ्यावी. शिवसेनेबद्दल काळजी घेण्याचं कारण नाही. मंत्रीपद चार महिने टिकते की, नाही याची काळजी घ्यावी, असंही विनायक राऊत म्हणाले.
केंद्रीय मंत्री नारायण राणे म्हणाले, देशाचे बरेच प्रश्न आहेत. पण, मीडियाला संजय राऊत पाहिजे. संजय राऊत याची विकृती लोकांना ऐकवण्याचं काम आपण करताय. हे मला योग्य वाटत नाही.
शिवसेनेच्या १९ जून १९६६ पासूनच्या पहिल्या ३९ वर्षे शिवसेना वाढविण्यासाठी तसेच सर्वकाही करण्यासाठी नारायण राणे शिवसेनेत होता. मी शिवसेना संपविण्याची सुपारी नाही घेतली. संजय राऊतने शिवसेना संपविण्याची सुपारी घेतली आहे.
शिवसेनेचे ५६ आमदार होते. आता १२ आमदारही राहिले नाही. शिवसेना संपविल्याचा आनंद संजय राऊत याला होत आहे. शिवसेनेचा शेवट करयला संजय राऊत तयार आहे, अशी टीकाही नारायण राणे यांनी केली.