उद्धव ठाकरे आणि शिवसेना सोडायला लावण्यासाठीच माझ्यावर दबाव; संजय राऊत यांचा गंभीर आरोप

| Updated on: May 15, 2023 | 12:06 PM

विधानसभा अध्यक्ष सुशिक्षित आहेत. त्यांना कायदा कळतो. ते शिवसेनेचे सुप्रीम कोर्टातील वकील होते. त्यांना शिवसेना काय आहे माहीत आहे. त्यामुळे आम्हाला कशाला तोंड उघडायला सांगतात? असा सवाल राऊत यांनी केला.

उद्धव ठाकरे आणि शिवसेना सोडायला लावण्यासाठीच माझ्यावर दबाव; संजय राऊत यांचा गंभीर आरोप
sanjay raut
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई : मी कोणतंही चुकीचं वक्तव्य केलंय असा मला वाटत नाही. मी सामान्य माणसाच्या मनातील कायद्याच्या चौकटीतील व्यथा व्यक्त केल्या आहेत. पण माझ्यावर दबाव आणला जात आहे. माझ्यावर काहीही करून माझ्यावर दबाव आणणं? मला शरण यायला भाग पाडणे? मग शिवसेना सोडायला लावणं, उद्धव ठाकरे यांना सोडायला लावणं अशा प्रकारची दबाव नीती माझ्यावर केली जात आहे, असा गंभीर आरोप करतानाच पण मी या दबावाला बळी पडणार नाही, असं ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी निक्षूण सांगितलं.

संजय राऊत हे मीडियाशी संवाद साधत होते. त्यांच्या एका विधानाविरुद्ध त्यांच्यावर नाशिकमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यावर त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. महाराष्ट्रातल्या सरकार संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिलेला आहे, ज्याला तुम्ही सत्ता संघर्ष म्हणतात, त्यावरून या सरकारमध्ये अजूनही अपात्रतेची टांगती तलवार आहे हे स्पष्ट झालं आहे.

हे सुद्धा वाचा

या सरकारचा या पक्षाचा या सरकारचा बेकायदेशीर आहे, असं संजय राऊत म्हणाले. यासंदर्भात राज्यपालांनी केलेली संपूर्ण प्रक्रिया बेकायदेशीर आहे. 16 आमदारांच्या अपात्रतेबाबत निर्णय घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने हे सगळं प्रकरण विधानसभा अध्यक्षांकडे पाठवलं आहे. पण हे सरकारच बेकायदेशीर असून त्यांच्यावर अपात्रतेची टांगती तलवार आहे, असा पुनरुच्चार राऊत यांनी केला.

कारवाईला सामोरे जाईल

अशा बेकायदेशीर सरकारचे आदेश कुणी पाळू नये, ते आता बेकायदेशीर ठरतील आणि बेकायदेशीर आदेशाचे पालन केल्याबद्दल भविष्यामध्ये त्या अधिकाऱ्यांना चौकशीला कारवाईला सामोरे जावे लागेल. ही भूमिका मी मांडली. याच्यामध्ये चिंता होण्याची भाषा, तणाव निर्माण करण्याची भाषा आली कुठून? देशभरामध्ये अशा प्रकारचे वक्तव्य नेहमी केले जातात. पण वक्तव्य संजय राऊत यांनी केलं म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल करण्याचे आदेश नाशिकच्या पोलिसांवर आले. पण जरी गुन्हा दाखल झाला असला तरी मी त्या कारवाईला सामोरे जाईल, असं राऊत यांनी स्पष्ट केलं.

शिवसेना नेते भेटणार

विधानसभा अध्यक्षांना आज शिवसेना नेते भेटणार आहेत. ही एक कायदेशीर प्रक्रिया आहे. सर्वोच्च न्यायालयाने 16 आमदारांच्या अपात्रतेचा विषय ताशेरे मारून हे कसं बेकायदेशीर आहे या संदर्भातला सविस्तर खुलासा करून ते सर्व प्रकरण विधानसभा अध्यक्ष आणि सोडवावा आणि निर्णय घ्यावा, असं ते म्हणाले. शिवसेनेचे आमचे प्रमुख लोक आज विधिमंडळात जाऊन त्या संदर्भात सविस्तर अपील दाखल करणार आहेत. तक्रार दाखल करणार आहेत, असंही त्यांनी सांगितलं.

कायदा आम्हालाही कळतो

काल मर्यादा हा शब्द ठीक आहे. वेळेची मर्यादा नाही असं सांगितलं जात आहे. पण प्रत्येक गोष्टीला मर्यादा आहे .सरकारला सुद्धा एक्सपायरी डेट असते. औषधाला असते. प्रत्येकाला आहे. आम्हालाही माहिती आहे. कायदा आम्हाला कळत नाही? आम्हालाही कायदा कळतो, असं त्यांनी सुनावलं.