मुंबई : माझ्या पसंतीने मला कपडे घालण्याचा अधिकार आहे. उर्फी जावेद (Urfi Javed) हिनं हे वक्तव्य केलंय. उर्फी जावेदचा आंबोली पोलिसांत (Police) हा जबाब पाहायला मिळतो. व्हायरल फोटोंना मी थांबवू शकत नाही. असंदेखील उर्फी जावेद हिनं म्हंटलंय. कामासाठी लागतात, असे कपडे मी घालते, असा जबाब उर्फी जावेद हिने दिला. कामामध्ये असताना कपडे बदलायला वेळ नसतो. असंदेखील उर्फीनं आपल्या जबाबात म्हटलं. उर्फीनं पोलिसांत जबाबात म्हटलं, मला माझ्या पसंतीने कपडे घालण्याचा, वागण्याचा, बोलण्याचा अधिकार आहे. तो अधिकार मला राज्यघटनेनं दिलाय. मी जे कपडे घातले ते माझ्या पसंतीचे घालते. माझ्या असे कपडे घालण्यावर माझ्या घरच्यांचा अजिबात आक्षेप नाही.
मी जे पकडे घातले ते माझ्या कामाच्या हिशोबाने घालते. त्यावरून माझं फोटो शूट होत असते. कधी कधी कपडे बदलण्याचा वेळ नसतो. त्याचवेळी कॅमेरा घेऊन आलेले लोकं माझे फोटो काढतात. ते फोटो व्हायरल होतात. ते मी कसे थांबवू. असा सवाल तिनं पोलिसांना दिलेल्या जबाबात विचारला.
चित्रा वाघ यांनी उर्फीचा हा नंगा नाच सहन करणार नाही, असं म्हटलंय. चित्रा वाघ यांनी उर्फीच्या कपडे वापरण्याच्या पद्धतीवर जोरदार हल्ला केला. त्यानंतर महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना ऊर्फीने भेट दिली. तिनं आपलं म्हणणं सांगितलं. पण, लेखी तक्रार दिली नाही. चित्रा वाघ यांच्या विरोधात लेखी तक्रार आल्यानंतर कारवाई करण्याचा इशाराचं रुपाली चाकणकर यांनी दिला होता.
या वादात आता अंजली दमानीया यांनीही उडी घेतली. कुणी कसे कपडे घालावेत काय बोलावं कसं वागावं. याचा प्रत्येकाला स्वतंत्रपणे अधिकार आहे. मात्र उर्फीच्या कपड्यांच्या बाबतीत बोलायला झालं तर त्यात नग्नता स्पष्टपणे खूप जास्त प्रमाणात दिसून येत आहे.
आधीचे काही फोटो पाहून चित्रा वाघ काहीतरी आरोप करतायत, असं वाटत होतं. मात्र तिचे दुसरे काही फोटो मी पाहिले जे अश्लील वाटतात. तुमच्या खाजगीत आणि घरात तुम्ही काहीही वापरा. पण सार्वजनिक रस्त्यावर वावरताना कपड्यांच भान असायलाच हवं. अभिव्यक्ती स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे. मात्र त्याच भान असायला हवं. आता तरी तिला समज यावी आणि हे सगळं थांबायला हवं असं मला वाटत, असं अंजली दमानिया म्हणाल्या.