“उद्या होणाऱ्या अधिवेशनात मी आक्रमक भूमिका घेणार”; राष्ट्रवादीच्या नेत्याचा सरकारला इशारा

| Updated on: Feb 27, 2023 | 4:55 PM

राज्यातील अनुशेषबाबत बोलताना त्यांनी सर्व क्षेत्रातील अनुशेष अजूनही जशाच्या तसा आहे. अनुशेषचा प्रश्न सोडवण्याचा विचार हे सरकार करत नाही. त्यामुळे या सरकारने अनुशेषचा प्रश्न तात्काळ सोडवण्याचा विचार केला पाहिजे अशी मागणीही त्यांनी या सरकारकडे केली आहे.

उद्या होणाऱ्या अधिवेशनात मी आक्रमक भूमिका घेणार; राष्ट्रवादीच्या नेत्याचा सरकारला इशारा
Follow us on

जळगावः राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारचे उद्यापासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे. त्याच्या आधीच सरकारवर आक्रमक होत विरोधकांना जोरदार हल्लाबोल केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यानी उद्याच्या अधिवेशनामध्ये मी आक्रमक भूमिका घेणार असल्याचे सांगत सरकारला इशारा देण्यात आला आहे. यावेळी एकनाथ खडसे यांनी राज्यातील परिस्थितीचा दाखला देत राज्यातील शेतकऱ्यांची अवस्था वाईट असल्याचे सांगत याकडे सरकारने दुर्लक्षे केले असल्याची टीकाही त्यांनी सरकारवर केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांना अधिवेशनावर बोलताना सांगितले आहे की, उद्यापासून सुरू होत असलेले अधिवेशन आहे ते अर्थसंकल्पीय अधिवेशन हे 30 दिवसाचं आहे मात्र ते दीड महिन्याचे अधिवेशन पाहिजे होते अशी मागणी त्यांनी केली आहे.

राज्याचे अनेक प्रश्न प्रलंबित असून एवढ्या कमी कालावधीत राज्याचे प्रश्न मांडता येत नाहीत आणि त्यावर चर्चाही केली जात नाही असं म्हणत त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली आहे.

शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात राज्याचे प्रश्न अणूउत्तरितच असून जैसे थे परिस्थिती असल्याची टीकाही त्यांनी त्यांच्यावर केली आहे. त्यातच या सरकारचे राज्यातील सामान्य जनतेकडेही लक्ष नसल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे.

राज्यातील अनुशेषबाबत बोलताना त्यांनी सर्व क्षेत्रातील अनुशेष अजूनही जशाच्या तसा आहे. अनुशेषचा प्रश्न सोडवण्याचा विचार हे सरकार करत नाही. त्यामुळे या सरकारने अनुशेषचा प्रश्न तात्काळ सोडवण्याचा विचार केला पाहिजे अशी मागणीही त्यांनी या सरकारकडे केली आहे.

सध्या राज्यातील शेतकरी हा अडचणीत आहे आणि हातबल आहे.कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न राज्यात उद्भवलेला आहे. या संदर्भात तक्रारी करूनही कुठलाही उपयोग अथवा त्याचा फायदा झाला नाही असा टोलाही त्यांनी शिंदे गटावर लगावला आहे.

हे सरकार स्वतंत्रपणे काम करत नसून राज्यातली यंत्रणा ही कोणाच्यातरी दबावाखाली काम करत आहे असा घणाघातही त्यांनी केला आहे.

त्यामुळे उद्या होणाऱ्या अधिवेशनात मी आक्रमक भूमिका घेणार आहे असा इशारा आमदार एकनाथ खडसे यांनी दिला आहे. तसेच या सरकारवर 6 लाख 66 हजार कोटी रुपयांच्या कर्ज असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी त्यांच्यावर केला आहे.