राज्यात कुणाचं सरकार येणार?, कोण मुख्यमंत्री? MATRIZE चा सर्व्हे काय सांगतो?

| Updated on: Nov 11, 2024 | 1:38 PM

IANS and MATRIZE Survey For Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक होतेय. अशात राज्यात कुणाची सत्ता येणार? कुणाला बहुमत मिळणार? कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार? याबाबतचा सर्व्हे समोर आला आहे. वाचा सविस्तर...

राज्यात कुणाचं सरकार येणार?, कोण मुख्यमंत्री? MATRIZE चा सर्व्हे काय सांगतो?
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४
Follow us on

महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक होत आहे. प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. ठिक ठिकाणी प्रचारसभा होत आहेत आणि महाराष्ट्राच्या जनतेला एकच प्रश्न पडलाय तो म्हणजे, राज्यात कुणाचं सरकार येणार? IANS वृत्तसंस्था आणि MATRIZE चा ओपीनियन पोल समोर आला आहे. यात महायुतीचं पारडं जड असल्याचं दिसत आहे. महायुती 145 ते 165 जागा येतील, असं या सर्व्हेतून समोर आलं आहे. तर महाविकास आघाडीला 106 ते 126 मिळतील, असं IANS वृत्तसंस्था आणि MATRIZE चा सर्व्हे सांगतो.

कुणाला किती जागा मिळणार?

राज्यात एकूण 288 जागांसाठी निवडणूक पार पडते आहे. यात कुणाला किती जागा मिळणार याबाबतचा सर्व्हे समोर आला आहे. यात महायुती 145 ते 165 जागा येतील असं IANS वृत्तसंस्था आणि MATRIZE चा सर्व्हे सांगतो. तर महाविकास आघाडीला 106 ते 126 मिळतील असं या सर्व्हेतून समोर आलं आहे.

पश्चिम महाराष्ट्रात एकूण 70 जागा

महायुती- 31 ते 38 जागा

महाविकास आघाडी- 29 ते 32

विदर्भ – एकूण जागा 62

महायुती- 32- 27

महाविकास आघाडी- 21 ते 26

मराठवाडा एकूण जागा 46

महायुती- 18 ते 24

महाविकास आघाडी- 20 ते 24

मुंबई- 36

महायुती- 21 ते 26

महाविकास आघाडी- 10 ते 13

ठाणे- कोकण एकूण जागा- 39

महायुती- 23 ते 25

महाविकास आघाडी- 10 ते 11

उत्तर महाराष्ट्र- 35

महायुती- 14 ते 16

महाविकास आघाडी- 16 ते 19

राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीचं वारं वाहतं आहे. अशात महाराष्ट्राची जनता कुणाला निवडून देणार? याचं उत्तर येत्या 23 नोव्हेंबरला मिळणार आहे. असं असतानाच IANS वृत्तसंस्था आणि MATRIZE चा सर्व्हे समोर आला आहे. यात महायुतीचं पारडं जड दिसत आहे. राजधानी मुंबईत महायुतीला 21 ते 26 जागा मिळण्याचा अंदाज आहे.

संजय राऊत यांनी मात्र या सर्व्हेत तथ्य नसल्याचं म्हटलं आहे. लोकसभेच्या वेळाला महाविकास आघाडीला १० जागा मिळणार नाही असं सांगत होते. ३१ जागा जिंकलो. सर्व्हे होता नरेंद्र मोदी ४०० पार. पण बहुमत मिळालं नाही. आता महायुतीचे लोकं कुठून सर्व्हे करतील आणि लोकांमध्ये भ्रम निर्माण करतील. यांचा भरवसा नाही. पण मी सांगतो महाविकास विकास आघाडीला १६० ते १६५ जागा मिळतील, असं राऊत म्हणालेत.