मुंबई : राज्यातील आयएएस (IAS Officer) अधिकाऱ्यांची खांदेपालट करण्यात आहे. यात 6 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. आता प्रशासनात (Government) मोठे बदल होत आहे. ए.बी. धुळाज, आयुक्त, रोजगार राज्य विमा योजना, मुंबई यांची MD, MAIDC, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यांच्यासह आणखी पाच अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. त्यामुळे आता अनेकांच्या विभागाचा कारभार बदलणार आहे. तसेच नवे अधिकारी आल्याने आता कार्यपद्धतीही बदलण्याची दाट शक्यता आहे. आज बदल्यांबाबत ही मोठी घोषणा करण्यात आली आहे. गेल्या दोन वर्षात कोरोनामुळे (Corona) राज्याचं मोठं नुकसान झालं आहे. तो तोटाही भरून काढण्याची जबाबदारी अधिकाऱ्यांवरही असते. हे अधिकारी प्रशासनात अत्यंत महत्वाचा घटक मानला जातो. त्यामुळे या बदल्यांना विशेष महत्व आहे.
गेल्या वेळी मात्र काहीसा वेगळा प्रकार समोर आल्याने थोडासा गोंधळ उडाला होता. कारण आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आणि त्या दुसऱ्याच दिवशी त्या बदल्या रद्दही झाल्या. त्यामुळे अधिकाऱ्यांमध्येही काही काळ संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. आता या बदल्यावर तरी शासन ठाम राहणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. ए.बी. धुळाज, ए.एन.करंजकर, श्रीमती बुवनेश्वरी एस, श्रीमती वनमथी सी, आशिष येरेकर, मदन नागरगोजे यांची आता खांदेपालट झाल्याने यांच्यावर नव्या ठिकाणची जबाबदारी असणार आहे.