मुंबई : “भाजपचा राज्यभर झालेला विस्तार हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळेच आहे. भाजपला गावागावात पोहोचवण्यात बाळासाहेबांचा मोठा वाटा आहे. बाळासाहेबांनी भाजपसोबत युती केली नसती तर भाजप गावपातळीपर्यंत पोहोचला नसता,” असा टोला शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी लगावला. आज (23 जानेवारी) बाळासाहेब ठाकरे यांची 95 वी जयंती आहे. यानिमित्त ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. यावेळी बोलताना स्थानिक पक्ष स्थापन करुन राजकारण करण्याची सुरुवातही बाळासाहेब ठाकरे यांनीच केल्याचंही ते म्हणाले.
“महाराष्ट्रात यापूर्वी भाजपचे अस्तित्व नव्हते. युती केल्यानंतर शिवसेनेसोबत भाजपचाही प्रचार झाला. त्यामुळे भाजप गावागावात पोहोचला. बाळासाहेबांनी युती केली नसती तर आज भाजप ग्रमीण भागापर्यंत वाढला नसता,” असे संजय राऊत म्हणाले. तसेच हे सत्य भाजपचे नेतेही स्वीकारतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
यावेळी त्यांनी शिवसेनेचा उगम, बाळासाहेबांचा मराठी माणसांसाठीचा लढा, यावर प्रकाश टाकला. बाळासाहेब ठाकरे शतकातून एकदाच घडतात. आज हिंदुत्वाची जी लाट निर्माण झाली आहे, त्याचे श्रेय बाळासाहेबांनाच जाते. बाळासाहेबांनी मराठी माणसाला लढण्याचं बळ दिलं. त्यांनी मराठी माणसाला प्रेरणा दिली. त्यांच्यामुळे आज मराठी माणूस उभा आहे, असे राऊत म्हणाले. तसचे बाळासाहेबांच्या या कामामुळे राज्यातील मराठी माणूस त्यांचे कायम स्मरण करत राहील असेही ते म्हणाले.
संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे शतकातून एकदाच निर्माण होतात, असं वक्तव्य केले. बाळासाहेबांनी राज्याच्या आणि देशाच्या राजकारणाला वेगळ वळण दिलं, त्यांनी हिंदुत्वाची लाट निर्माण केली. बाळासाहेब ठाकरेंचे स्मरण ठेवावं लागेल, असं संजय राऊत म्हणाले.
लोकांसाठी झटणाऱ्यांना जनता कधीही विसरत नाही; शरद पवारांचा कानमंत्रhttps://t.co/ffaRjANI1u#SharadPawar | #ncp | #Maharashtra | #Pune
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 23, 2021