मुंबई: आज साक्षात प्रभू रामचंद्र जरी पृथ्वीवर अवतरले आणि त्यांनीही शेतकऱ्यांची (Farmers Protest) बाजू घेतली तर भक्तमंडळी त्यांनाही देशद्रोही, खलिस्तानी आणि काँग्रेसी म्हणायला कमी करणार नाहीत, असा खोचक टोला मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप (Bhai Jagtap) यांनी लगावला. भक्त लोकांच्या डोक्यावर इतका परिणाम झाला आहे की ते आपल्याविरोधात असणाऱ्या प्रत्येकाला टोकाचा विरोध करतील, असे भाई जगताप यांनी ट्विट करुन म्हटले.
आज साक्षात प्रभू रामचंद्र जरी पृथ्वीवर अवतरले व त्यांनी शेतकऱ्यांची बाजू घेतली तरी
भक्त आणि दलाल माध्यमे त्याना खलिस्तानी, देशद्रोही आणि काँग्रेसी ठरवतील…
इतका स्वतः च्या डोक्यावर परिणाम करून घेतला आहे या भक्तांनी..!!
— Bhai Jagtap – भाई जगताप (@BhaiJagtap1) February 3, 2021
शिवसेनेच्या नेत्यांकडून रस्त्यावरच्या फेरीवाल्यांकडून परस्पर पैसे घेतले जात असल्याच्या मुद्द्यावर मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप (Bhai Jagtap) यांनी कडाडून टीका केली. फेरीवाल्यांकडून पैसेवसुली करणाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे. काँग्रेस पक्षातील कोणत्या नेत्याने अशाप्रकारचे कृत्य केले असते तर मी थेट कारवाई केली असती, असे भाई जगताप यांनी म्हटले.
ते गुरुवारी मुंबईतील पत्रकारपरिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस 227 जागांवर स्वबळावर लढणार असल्याचा पुनरुच्चार केला. यावेळी त्यांनी मुंबई महानगरपालिकेने मांडलेल्या अर्थसंकल्पावर ताशेरेही ओढले. पालिकेचा अर्थसंकल्प हा फुगवलेला आहे. यंदाच्या वर्षी कर वाढतील, अशी भीती मुंबईकरांना होती. मात्र, सुदैवाने तसे घडले नाही. मात्र, महानगरपालिका प्रशासन 500 फुटांखालील घरांना सरसकट करमाफी का लागू करत नाही, असा सवाल भाई जगताप यांनी उपस्थित केला.
संबंधित बातम्या:
कंगना रोहित शर्माच्या ट्विटवर म्हणाली, हे सर्व क्रिकेटर्स म्हणजे धोबी का कुत्ता, घर का ना घाट का!
जगप्रसिद्ध पॉपस्टारच्या ट्विटला उत्तर देताना कंगना म्हणते, आंदोलन करणारे शेतकरी नाहीत तर दहशतवादी !
Farmer Protest: भारतासाठी काय चांगलं हे आम्हाला कळतं, बाहेरच्यांनी नाक खुपसू नये: सचिन तेंडुलकर