हिंमत असेल तर शिवाजी महाराज आणि बाबासाहेबांचा फोटो हटवून मते मागा; कुणी दिलं उद्धव ठाकरेंना चॅलेंज?

| Updated on: Jun 20, 2024 | 2:53 PM

Udhav Thackeray : सध्या शिवसेनेतील दोन्ही गटात पुन्हा कलगीतुरा रंगला आहे. शिवसेना स्थापना दिनानंतर दोन्ही गट एकमेकांवर तुटून पडले आहेत. एकमेकांना ताकद दाखविण्याचे आव्हान करण्यात येत आहे. आता शिंदे गटातून या नेत्याने प्रतिवार केला आहे.

हिंमत असेल तर शिवाजी महाराज आणि बाबासाहेबांचा फोटो हटवून मते मागा; कुणी दिलं उद्धव ठाकरेंना चॅलेंज?
uddhav thackrey and sanjay raut
Follow us on

शिवसेनेचा स्थापना दिन दोन्ही गटांनी जोरात साजरा केला. पण एकमेकांवर फटाके फोडले. उद्धव ठाकरे गटाने लोकसभेत जोरदार मुसंडी मारली. तर महायुतीला मोठे यश खेचून आणता आले नाही. काल उद्धव ठाकरे आणि आज संजय राऊत यांनी शिंदे गटाला डिवचले. त्यावरुन दोन्ही गटात शाब्दिक चकमक उडाली आहे. एकमेकांना ताकद दाखविण्याचे आव्हान करण्यात येत आहे. त्यातच शिंदे गोटातून या नेत्याने उद्धव ठाकरे यांना चॅलेंज दिले आहे.

टीका करण्याशिवाय उद्योग काय?

शिवसेनेच्या शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल केला. टीका करण्याशिवाय त्या गटाला उद्योग काय? उबाठा ला एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केल्याशिवाय प्रसिद्धी मिळत नाही. मिंधे वगैरे असे काही विश्लेषण लावून टीका केली की त्यांना प्रसिद्धी मिळते असा टोला त्यांनी हाणला.

हे सुद्धा वाचा

पण त्यांनी वाजवली जुनी शिट्टी

शिवसेनाप्रमुखांमुळे आणि शिवसैनिकांनी शिवसेना मोठी केली त्यांना आठवण करण्याचा हा दिवस होता. परंतु त्यांनी जुनी शिट्टी वाजवली. माझा बाप चोरला माझा पक्ष चोरला माझं चिन्ह चोरलं. ते का शिवसेनाप्रमुखांना छोटा करतात? बाळासाहेबांना संपूर्ण जगात मानणारा वर्ग आहे, अडीच वर्ष सरकारमध्ये होते विधान भवनांमध्ये बाळासाहेबांचा तैल चित्र का लावलं नाही ते आम्ही लावलं, समृद्धी महामार्गाला आम्ही नाव दिले, असा पलटवार संजय शिरसाट यांनी केला.

मग दाखवा हिंमत

तुमच्यात हिंमत असेल तर फार हिंमतवाण आहात ना मग तुमच्या व्यासपीठावरून बाबासाहेबांचा फोटो हटवा आणि शिवाजी महाराजांचा फोटो पाठवा आणि मग मत मागा. यांचे कोणी वंशज नाहीयेत का त्यांनी जेव्हा आक्षेप घेतला का? पण हे प्रत्येक वेळेस आमचा बाप चोरला आहे. वारंवार सांगत आहे आणि शिवसेनाप्रमुखांना छोटे करण्याचा प्रयत्न करत आहेत. उद्धव ठाकरे काही दिवसांमध्ये जाऊन राहुल गांधी आणि शरद पवार यांच्या चरणीलीन होणार आहेत. जागा वाटप सुरू होऊ द्या बघा काँग्रेस त्यांना गुडघ्यावर टेकून लीन करेल, असा घणाघात त्यांनी केला.

त्यांच्याकडून अपेक्षा तरी काय?

या संजय राऊत ने आतापर्यंत केलेले भाकीत एक तरी खरे झाले का? मोदींना ब्रँड नाहीतर ब्रँडी म्हणतो या बेवड्याकडून अपेक्षा काय करायची, अशी टीका शिरसाट यांनी केली. कोणाबद्दल बोलताय हे तरी पहा. माणसाने आपली औकात पाहून बोललं तर ते चांगलं असतं. त्यांचे बेवडे रोज काही बोलतात बेवडे म्हणावं काय म्हणावं, त्यांच्यामुळे त्यांच्या पक्षाचे नुकसान झालंच आहे. आम्ही जास्त काळजी करत नाही, असे ते म्हणाले.

शिवसेनाप्रमुखांचा आदर्श ठेवतात ना तर मग त्यांनी हात ठेवून शपथ घेऊन सांगावं की तुम्ही कशामुळे निवडून आला आहात, कुठे आहे तुमचा शिवसैनिक? घटना बदल होणार असा जो प्रचार केला त्यामुळे आमच्या मुस्लिम आणि तुम्हाला मतं दिली. मान्य करा. हिंमत असेल तर तुम्ही असं सांगा

त्यांचा तिथेच फ्लॅट

यांना उद्योग राहिलेले नाहीत यांनी सुप्रीम कोर्टाच्या बाजूला भाड्याने फ्लॅट घेतला आहे कारण त्यांना सुप्रीम कोर्ट जवळ पडावं म्हणून… आतापर्यंत काय गोठ्या खेळत होते का? तुम्ही सुप्रीम कोर्टात न्याय मागा तुमचा जर सुप्रीम कोर्टावर विश्वास असेल तर, सुप्रीम कोर्टाने निकाल दिल्यावर पुन्हा म्हणाले हे मोदींचे बटीक होतं, असा टोला त्यांनी लगावला.