मुंबईः पदवीधर मतदार संघाच्या निवडणुका जाहीर होताच नाशिक मतदार संघातील काँग्रेसचे नेते सत्यजित तांबे आणि त्यांचे वडिल सुधीर तांबे यांच्यामुळे जोरदार चर्चा झाली. काँग्रेसच्या उमेदवारांना भाजपकडून पाठिंब्याची चर्चा सुरू झाल्यानंतर काँग्रेसमधील ज्येष्ठ नेत्यांसह महाविकास आघाडीतील मित्रपक्षांनीही आश्चर्य व्यक्त केले. त्यामुळे यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी याविषयी बोलताना सांगितले की, नाशिकमध्ये ज्या पद्धतीने तांबे यांच्याबाबतीत जे घडले आहे ते काँग्रेससाठी गंभीर आहे.
त्यामुळे आता पदवीधरबाबत विचार करताना महाविकास आघाडीतील महत्वाच्या नेत्यांच्या उपस्थित बैठक होऊ निर्णय घेतला जाईल असं यावेळी अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले. पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीबाबत भाजपकडून ज्या पद्धतीने फोडाफोडीचे राजकारण झाले आहे.
त्यामुळे महाविकास आघाडीने विचारपूर्वक निर्णय घेण्याचा विचार घेतला आहे. त्यामुळे आज माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबरोबर बैठक घेऊन चर्चा केली जाणार आहे.
या बैठकीत पदवीधर संदर्भात जी काय चर्चा होईल ती महाविकास आघाडीची एकत्रच चर्चा आणि निर्णय होईल असंही यावेळी अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले.
मागील निवडणुकीचा संदर्भ देत, चंद्रकांत हंडोरे आणि भाई जगताप यांच्याविषयी काँग्रेसमध्ये मतभेद दिसले तसे काही मदभेद होणार का असा सवाल उपस्थित करण्यात आला होता.
त्यावर उत्तर देताना अशोक चव्हाण यांनी सांगितले की, काँग्रेस अंतर्गत कोणतेही वाद नाहीत, कारण आता सध्या महाविकास आघाडीचा उमेदवार पदवीधर निवडणुकीत निवडून आणणं हेच ध्येय असल्याचेही त्यांनी सांगितले.
महाविकास आघाडीती पक्ष शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील प्रमुख नेते आणि उद्धव ठाकरे यांच्यासोबत महत्वपूर्ण बैठक होऊन जो निर्णय होईल तो मविआसाठीच असणार आहे असंही यावेळी अशोक चव्हाण यांनी स्पष्ट सांगितले.