सोलापूरः राज्यात सध्या कर्नाटक-महाराष्ट्र सीमावादावरुन प्रचंड गदारोळ माजला आहे. विरोधकांसह सत्ताधाऱ्यांकडून कर्नाटकच्या मुख्यमंत्री यांच्यावर टीकास्त्र सोडले जात असताना ॲड. गुणवंत सदावर्ते यांनी आता थेट शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनाच इशारा दिला आहे. कर्नाटक-महाराष्ट्र वाद सुरू असतानाच गुणवंत सदावर्ते यांनी स्वतंत्र मराठवाडा आणि स्वतंत्र विदर्भाची मागणी करत शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
ॲड. गुणवंत सदावर्ते यांनी आपण छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे वैचारिक वारस असल्याचे सांगत त्यांनी स्वतंत्र मराठवाडा आणि स्वतंत्र विदर्भाची मागणी केली आहे.
याविषयी बोलताना ते म्हणाले की, मानवी विकास व्हावा त्याकरिता स्वतंत्र विदर्भ आणि स्वतंत्र मराठवाडा झालाच पाहिजे आणि तो होणारच हा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
गुणवंत सदावर्ते यांनी स्वतंत्र विदर्भ आणि स्वतंत्र मराठवाड्याची मागणी केल्यानंतर त्यांनी थेट शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनाच प्रश्न विचारला आहे.
स्वतंत्र विदर्भ आणि स्वतंत्र मराठवाड्याविषयी तुमची भूमिका काय आहे असा सवालही त्यांनी केला आहे. गुणवंत सदावर्ते यांनी विदर्भ आणि मराठवाडा स्वतंत्र का झाला पाहिजे याविषयी बोलताना त्यांनी विकासाचा मुद्दा पुढे केला आहे. यावरूनच त्यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना निशाण्यावर घेतले आहे.
सदावर्ते यांनी आपला वैचारिक वारसा सांगताना ते म्हणाले की, आपण छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि स्वातंत्र्यवीर सावरक यांचे आपण वैचारिक वारसदार असल्याच सांगत. कर्नाटक आणि महाराष्ट्र वादावर आज नाही आपण उद्या आपली भूमिका मांडणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.