Monkeypox: भारतात आढळला मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण; तीन दिवसांपूर्वीच युएईतून भारतात दाखल; जाणून घ्या काय आहेत लक्षणं

| Updated on: Jul 14, 2022 | 11:13 PM

मंकीपॉक्स हा विषाणूजन्य रोग आहे. त्याची लक्षणे स्मॉलपॉक्ससारखीच असून हा रोग 1958 मध्ये संशोधनासाठी वापरण्यात येणाऱ्या माकडांमध्ये आढळून आला होता. त्यामुळे त्याचे मंकीपॉक्स असे नाव पडले. हा विषाणू हवेतून पसरत नाही, मात्र माणसाकडून माणसाला किंवा जनावरांकडून माणसाला स्पर्श झाला तर त्याची लागण होत असल्याचे सांगण्यात आले आहे.

Monkeypox: भारतात आढळला मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण; तीन दिवसांपूर्वीच युएईतून भारतात दाखल; जाणून घ्या काय आहेत लक्षणं
Follow us on

नवी दिल्लीः कोरोनाचे (Corona) संकट कमी होत असतानाच आता मंकीपॉक्सचा (Monkeypox) एक रुग्ण गुरुवारी केरळमध्ये (Keral) सापडला आहे. मंकीपॉक्सचा हा देशातील पहिला रुग्ण (first monkeypox case) असल्याचे सांगण्यात येत आहे. संक्रमित व्यक्ती ही तीन दिवसांपूर्वीच युएईतून भारतात आली असल्याची माहिती देण्यात आली आहे, तसेच त्याच्या संपर्कात 11 जण आले असून त्या सर्वांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. त्यामुळे केरळमधील आरोग्य यंत्रणेला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

तीन दिवसांपूर्वी यूएईतून भारतात

ज्या व्यक्तीला मंकीपॉक्ची लागण झाली आहे ती व्यक्ती तीन दिवसांपूर्वी यूएईतून भारतात आली आहे. त्या व्यक्तीमध्ये मंकीपॉक्सचे लक्षणे आढळून आल्याने त्याचे नमुने पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीमध्ये तपासणीसाठी देण्यात आले होते, त्यानंतर या प्रकरणाची नोंद करण्यात आली असल्याची माहिती केरळच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी दिली आहे.

मंकीपॉक्स विषाणूजन्य रोग

मंकीपॉक्स हा विषाणूजन्य रोग आहे. त्याची लक्षणे स्मॉलपॉक्ससारखीच असून हा रोग 1958 मध्ये संशोधनासाठी वापरण्यात येणाऱ्या माकडांमध्ये आढळून आला होता. त्यामुळे त्याचे मंकीपॉक्स असे नाव पडले. हा विषाणू हवेतून पसरत नाही, मात्र माणसाकडून माणसाला किंवा जनावरांकडून माणसाला स्पर्श झाला तर त्याची लागण होत असल्याचे सांगण्यात आले आहे.

या आजाराची लक्षणे

पुरळ येणे, ताप येणे ही या आजाराची लक्षणे आहेत. साधारण 2 ते 4 आठवडे हा आजार राहू शकतो. याचा मृत्यूदर 1 टक्के ते 10 टक्क्यांपर्यंत आहे. तसेच मंकीपॉक्सचा संसर्गापासून लक्षणांपर्यंतचा काळ साधारणतः 7 ते 14 दिवसांचा असतो. मात्र तो 5 ते 21 दिवसांपर्यंत वाढू शकतो असे यूएस सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशनने (CDC) सांगितले आहे.