राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं एकनाथ शिंदे यांच्यासह महाराष्ट्रातील ‘या’ कायदे तज्ज्ञालाही निमंत्रण

| Updated on: Jan 08, 2024 | 1:58 PM

राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं राज्यातील प्रसिद्ध सरकारी वकिल उज्ज्वल निकम यांना निमंत्रण आलं आहे. त्यासोबतच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही निमंत्रण मिळाल्याची माहिती दिली आहे.

राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं एकनाथ शिंदे यांच्यासह महाराष्ट्रातील या कायदे तज्ज्ञालाही निमंत्रण
CM Eknath Shinde Ram Mandir
Follow us on

मुंबई : अयोध्येमधील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावरून राज्यातील राजकारण तापलं आहे. विरोधी पक्षातील अनेक प्रमुख नेत्यांना निमंत्रण दिलं गेलेलं नाही. यावरून केंद्र सरकार आणि राज्य सरकारवर विरोधी नेते टीका करत आहेत. अशातच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्याचे विशेष सरकारी वकील ॲड. उज्ज्वल निकम यांना निमंत्रण देण्यात आलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत ट्विट करत माहिती दिली आहे.

जळगावचे मूळ रहिवासी आणि राज्याचे विशेष सरकारी वकील ॲड उज्वल निकम यांचाही समावेश आहे. अयोध्या येथील रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं ॲड.उज्ज्वल निकम यांना निमंत्रण देण्यात आलं आहे. महाराष्ट्रातून एकूण 889 जणांना राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी निमंत्रण देण्यात आले आहे. त्यात 534 विशेष निमंत्रित केलं गेलं आहे. उद्योग, कला, क्रीडा, तसेच आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय स्तरावर पुरस्कार प्राप्त व्यक्तींचा समावेश आहे.

उज्ज्वल निकम यांची प्रतिक्रिया

हा भव्य, दिव्य आणि नयनरम्य सोहळा पाहण्याची प्रत्येक भारतीयाची इच्छा आहे. परंतु जागेअभावी खास निमंत्रितांनाच या सोहळ्यासाठी निमंत्रण देण्यात आले आहे. देशभरातील दिग्गज मंडळी, संत-महंतांना या सोहळ्यासाठी निमंत्रण देण्यात आले आहे. निमंत्रणाचा अतिशय आनंद होत असल्याची प्रतिक्रिया उज्वल निकम यांनी बोलताना दिली आहे.

एकनाश शिंदेंची ट्विट करत माहिती

 

दरम्यान, एकनाथ शिंंदे यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कोकण प्रांत संपर्कप्रमुख अजय जोशी विश्व हिंदू परिषदेचे संयुक्त क्षेत्र संपर्कप्रमुख संजय ढवळीकर यांनी आमंत्रित केलं. एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी ते जात त्यांना आमंत्रित केलं आहे.